Just For Hearts

Lifestyle

आरोग्य फक्त माहितीने बदलत नाही, ते कृतीने बदलतं

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

आरोग्य फक्त माहितीने बदलत नाही… ते रोजच्या कृतीने बदलतं.

25+ वर्षांच्या clinical practice मध्ये एक गोष्ट खूप स्पष्ट झाली आहे: रुग्णांना काय करायचं हे माहिती नसतं असं नाही… पण ते रोज करणं जमत नाही. आणि इथूनच आरोग्याचा खरा फरक सुरू होतो.

Atomic Habits या पुस्तकातील काही विचार आणि OPD मधील अनुभवातून तयार झालेली ही practical शिकवण:

1. Goals नाही… Systems काम करतात “Weight कमी करायचं” हा विचार आहे. “रोज 20 मिनिटं चालणं” ही system आहे. शरीर systems ला respond करतं.

2. Small change मोठा फरक करतो आज 1% सुधारणा → वर्षभरात मोठा बदल. Crash नाही… compound health.

3. Identity बदलली की सवय बदलते “मी diabetic आहे” ❌ “मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो” ✔️ तुम्ही स्वतःला काय समजता तेच तुम्ही करता.

4. Motivation वर आरोग्य टिकत नाही उत्साह येतो-जातो. Routine टिकतो. Environment habit बनवतो.

5. जे दिसतं ते केलं जातं BP machine दिसेल तिथे ठेवा. Shoes दाराजवळ ठेवा. Visibility = Action.

6. Habit इतकी सोपी ठेवा की टाळणं कठीण जावं 1 तास walk नाही जमत? 10 मिनिटं करा. सुरू करणं महत्त्वाचं.

7. Habit जोडली की टिकते Brush → BP check. Dinner → walk. जोडलेली सवय तुटत नाही.

8. एक दिवस चुकला चालेल… दोन नाही Consistency perfect पेक्षा महत्त्वाची. Break chain करू नका.

9. Progress दिसायला हवा BP, sugar, weight track करा. Brain ला improvement दिसला की habit टिकते.

10. OPD मधला खरा अनुभव जे रुग्ण रोज छोट्या सवयी पाळतात तेच long-term stable राहतात. Perfect लोक नाही… consistent लोक जिंकतात.

Team Just For Hearts motivation शिकवत नाही, तर systems तयार करते. Daily habits, tracking, आणि guidance यातूनच sustainable बदल होतो आणि हाच आमचा approach आहे.

लक्षात ठेवा, तुम्ही आज काय वाचलं ते महत्त्वाचं नाही… तुम्ही उद्या काय repeat करणार ते महत्त्वाचं आहे.

खरं सांगायचं तर… आपल्याला सगळं माहिती असतं. पण रोज करणं कठीण जातं.

आज तुम्ही कुठे आहात?

* “माहिती आहे… पण सातत्य नाही” * “प्रयत्न सुरू आहेत” * “रोज थोडं तरी करतोय” * “पुन्हा सुरू करायचं आहे”

एक emoji reply करा (कुणालाही सांगण्याची गरज नाही… स्वतःशी प्रामाणिक राहा).

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#atomic-habits#habit-building#lifestyle-medicine#consistency#health-systems#daily-habits#metabolic-health#health-transformation
Share:WhatsAppXFacebook