Just For Hearts

Heart Health

Bypass / Angioplasty नंतर रुग्ण करत असलेल्या १० चुका

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Bypass / Angioplasty नंतर अनेक रुग्ण काही चुका करतात ज्यामुळे गुंतागुंत होऊ शकते किंवा ICU मध्ये परत जाण्याची शक्यता वाढते. टाळावयाच्या १० सामान्य चुका पुढीलप्रमाणे आहेत:

1. चालणं थांबवणं - रोज चालत नसल्यास ब्लॉकेज परत येऊ शकते.

2. Junk, oily किंवा Non-veg अन्न पुन्हा सुरू करणं - जुना स्वाद परत घेणे नवीन त्रास निर्माण करतो.

3. औषधं चुकवणं किंवा बंद करणं - बरं वाटू लागल्यावर औषधं थांबवणं ही चूक आहे.

4. Blood Pressure किंवा Sugar मोजणं टाळणं - मोजलं नाही तर समस्या लवकर पकडता येत नाही.

5. जास्त स्ट्रेस घेणं - मनावर ताण असल्यास हृदयावर धोका वाढतो.

6. Smoking चालू ठेवणं - एक झुरका सुद्धा स्टेंटचा अपमान आहे.

7. वजन वाढू देणं - पोट वाढल्यास रिस्क वाढतो.

8. Follow-up टाळणं - डॉक्टरांना वेळेवर भेट न दिल्यास संधी गमावतात.

9. लक्षणांकडे दुर्लक्ष करणं - थकवा, धडधड, छातीत जडपणा यांना दुर्लक्ष करू नका.

10. जुन्या lifestyle मध्ये परत जाणं - ज्यामुळे त्रास झाला तोच lifestyle पुन्हा सुरू करणं धोका निश्चित आहे.

Bypass / Angioplasty म्हणजे सुटका नाही, ती दुसरी संधी आहे. ती वाया घालवू नका!

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#bypass#angioplasty#heart-health#lifestyle#medication#follow-up#stress#smoking
Share:WhatsAppXFacebook