Just For Hearts

Fitness

10000 पावलं: एकाच वेळी की दिवसभर विभागून चालणं? काय योग्य?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

अनेक जण विचारतात की 10000 पावलं एकाच वेळी सकाळी चालणं चांगलं आहे की ती दिवसभर विभागून चालणं अधिक फायदेशीर आहे?

सकाळी एकदाच 10000 पावलं चालण्याचे फायदे म्हणजे दिवसाची जोरदार सुरुवात होते, metabolism सक्रिय होते आणि exercise पूर्ण झाल्याचं समाधान मिळतं.

पण काही अडथळे देखील येतात जसे की वेळ मिळणं कठीण होणं आणि नवीन सुरुवात करणाऱ्यांना एकाच वेळी जास्त चालल्याने थकवा येणं.

दिवसभर 2-3 वेळा चालल्याने सतत हालचाल होत राहते आणि लांब वेळ बसण्याचा परिणाम कमी होतो.

हे blood sugar आणि BP नियंत्रणासाठी तसेच joints health साठीही अधिक उपयुक्त ठरते.

दिवसभर चालण्यामध्ये शिस्त पाळणं आवश्यक असतं; कधी कधी breaks घ्यायला विसरल्यामुळे target पूर्ण होत नाही.

नवीन सुरुवात करणाऱ्यांसाठी छोटे-छोटे walks विभागून करणं अधिक सोपं आणि टिकाऊ असतं.

ज्यांना आधीपासून सवय आहे त्यांच्यासाठी सकाळी 6000-7000 पावलं चालणं आणि दिवसभर छोटे breaks घेणं उत्तम combination आहे.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पद्धत कोणतीही असो, consistency सर्वात महत्त्वाची आहे.

निष्कर्ष असा की पावलं महत्वाची आहेत, clock नाही – चालणं सुरू ठेवा आणि तुमच्या lifestyle नुसार पद्धत ठरवा.

तुमचं काय मत आहे? तुम्ही सकाळी एकदाच चालता का दिवसभर विभागून? तुमचा अनुभव कमेन्टमध्ये नक्की सांगा!

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#walking#fitness#morning-walk#exercise#steps#health#lifestyle
Share:WhatsAppXFacebook