Just For Hearts

Heart Health

एक शेवटचा संवाद...

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

15 वर्षांपासून माझ्याकडे एक रुग्ण उपचारासाठी होता ज्याला Chronic Kidney Disease आणि Chronic Heart Failure होते, अनेक चढ-उतार अनुभवले. प्रत्येक वेळी उपचार, वेळेवर निर्णय, ICU ते घरपर्यंतचा प्रवास चालत होता. मी आणि कुटुंबीय मिळून एक लढा लढत होतो.

मागील काही महिने फार कठीण गेले. शक्य ते सगळं केलं – औषधं, dialysis, nutrition, monitoring – पण शरीर थकलं होतं. काही दिवसांपूर्वी ICU मध्ये admit झाला. एकामागून एक organ fail होत गेले. शेवटी आज ventilator लागला.

मी डॉक्टर म्हणून ते सगळं करत होतो, जे करताना मनही थकतं… पण थांबत नाही.

अशा टप्प्यावर, एका दुपारी ICU च्या बाहेर त्यांची मुलगी माझ्या जवळ आली.

“डॉक्टर… मी बाबांना काही बोलू का? ते ऐकतील का?”

मी काही क्षण शांत राहिलो.

शरीर निष्क्रिय होतं, यंत्रांच्या आधारे चाललेलं. पण मी एक गोष्ट मनापासून मानतो:

“रुग्ण ventilator वर असला, प्रतिसाद देत नसला तरी, तो ऐकत असतो. आपल्या जवळच्यांच्या भावना, शब्द, स्पर्श हे त्याच्यापर्यंत पोहोचतात.”

मी ICU चं दार थोडं उघडलं… आणि तिच्या शब्दांनी सगळं वातावरण निःशब्द झालं.

ICU ही लढाई असते डॉक्टर आणि नियतीमधली.

डॉक्टरांची team जीवाच्या ताकदीने लढते… पण नियतीच्या हस्ताक्षरात शेवट आधीच लिहिलेला असतो.

त्या क्षणी मी डॉक्टर नव्हतो — मी एक साक्षीदार होतो एका मुलीच्या शेवटच्या संवादाचा…

“कधी कधी आयुष्य तुम्हाला तुमच्या कर्तव्याच्या पलिकडे नेऊन उभं करतं — जिथे भावना बोलतात आणि देव ऐकतो.”

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#icu#chronic-kidney-disease#chronic-heart-failure#ventilator#doctor-patient#emotional-strength#family-support
Share:WhatsAppXFacebook