Lifestyle
सकाळी बदाम खाल्ले पाहिजे की रात्री?
तुम्ही सकाळी बदाम खाताय का? आज रात्री बदाम खाऊन बघा.
बहुतेक लोक फक्त सकाळी स्मरणशक्तीसाठी आणि उर्जेसाठी बदाम खातात.
पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर झोप सुधारण्यासाठी बदाम रात्री खाणे जास्त उपयुक्त ठरते.
कारण काय?
- बदामांमध्ये magnesium, zinc आणि melatonin असतात — हे घटक झोप लागण्यासाठी शरीर तयार करतात. - ते रक्तातील साखर स्थिर ठेवतात, ज्यामुळे रात्री 2–3 वाजता उठण्याची शक्यता कमी होते. Diabetes रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे. - Journal of Research in Medical Sciences च्या अभ्यासानुसार, 500 mg magnesium झोपेचा दर्जा आणि वेळ सुधारतो.
झोपायच्या 30–60 मिनिटांपूर्वी 4–5 बदाम खा. औषध न घेता झोपेचा दर्जा सुधारेल.
“स्मरणशक्ती महत्त्वाची आहे, पण झोप देखील तितकीच महत्त्वाची आहे — आणि त्यासाठी बदाम रात्री उपयोगी आहेत!”
हा पोस्ट आवडल्यास नक्की share करा.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts