Lifestyle
सकाळी लवकर उठणं ही सवय नसून, आरोग्यासाठी नैसर्गिक औषध आहे!
सकाळी लवकर उठणं ही सवय नसून, आरोग्यासाठी नैसर्गिक औषध आहे!
सकाळची सवय म्हणजे हार्मोन्सपासून मेंदूपर्यंत सर्व सिस्टिम्सचं ‘Reset’ बटन!
✅ फायदे : वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून:
1. डायबेटीस कंट्रोल सुधारतो, वजन कमी होतो. सकाळच्या वेळेत इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जास्त असते, म्हणजे शरीर साखर अधिक प्रभावीपणे वापरतं. Physical activity सकाळी केल्यास glycemic variability कमी होते. ✅
👉 म्हणूनच लवकर उठून चालणं + पाणी + सौम्य व्यायाम = रोजचं डायबेटीस नियंत्रण.
2. रक्तदाब आणि हृदयाचे आजार टाळण्यास मदत होते. सकाळच्या शांत वातावरणात चालणं, ध्यान करणं हे parasympathetic system सक्रिय करतं. Sympathetic overdrive (रात्रभरचा ताण) कमी होतो → BP control सुधारतो. ✅
👉 लवकर उठणं म्हणजे हृदयासाठी दिलासादायक सुरुवात.
3. नैसर्गिक circadian rhythm घड्याळाशी sync होते. सकाळी उठल्याने Melatonin-Cortisol rhythm सुधारतो. त्यामुळे झोप, जेवण, औषधं, सगळं वेळेवर आणि प्रभावी. ✅
👉 जे वेळेवर झोपतात–उठतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहते.
4. Brain fog कमी, आत्मविश्वास वाढतो. लवकर उठल्यावर cognitive clarity जास्त असते, म्हणजे विचार स्पष्ट, मूड स्थिर. ✅
👉 रोज सकाळी अर्धा तास स्वतःसाठी = मानसिक शांतता.
5. मूड, झोप, एनर्जीचं हार्मोनल संतुलन सुधारते. Cortisol spike सकाळी नैसर्गिक असतो, तो वेळेवर झाला की दिवसभर उत्साह टिकतो. Melatonin रात्री योग्य वेळी वाढतो, शांत झोपेसाठी. ✅
👉 लवकर उठणं = झोप सुधारते = सकाळ सुधारते = आरोग्य सुधारतं.
“सकाळी लवकर उठणं म्हणजे आजारांचं प्रतिबंधक औषध!”
औषधांपेक्षा रूटीन बदला, त्याचा परिणाम खोलवर आणि टिकाऊ असतो.
तुम्ही किती वाजता उठता? 6.30 am वाजेपूर्वी की 8 am नंतर? तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये द्या, आणि ही पोस्ट WhatsApp / Groups मध्ये नक्की शेअर करा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts