Just For Hearts

Gut Health

ब्लोटिंग Bloating म्हणजे फक्त गॅस नाही, तर ‘शरीर नीट काम करत नाही’ याचा पहिला इशारा!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

ब्लोटिंग म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटणं, पोट कडक होणं, आणि हलकं न वाटणं. हे फक्त गॅसचं कारण नसून, तुमच्या पचनसंस्थेचं नीट काम न होण्याचा इशारा असू शकतो.

ब्लोटिंग कमी करण्यासाठी 6 पचन-सुधारणारे उपाय आणि त्यांचे फायदे:

1. सकाळी कोमट पाणी + सुंठ किंवा ओवा → यामुळे रात्रभर साचलेले टॉक्सिन बाहेर पडतात आणि पचनासाठी आतडं जागं होतं. (सुंठ = anti-inflammatory, ओवा = bloating reducer)

2. दिवसात 2–3 वेळाच जेवण करा आणि मधूनमधून खाणं टाळा → अनेक लहान जेवणं पचनसंस्थेला सतत काम करायला लावतात, ज्यामुळे इन्सुलिन वारंवार वाढतो आणि पचनासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे फुगणं आणि गॅस वाढू शकतो.

3. जेवल्यानंतर 10 मिनिटं हळू चालणे → यामुळे पोट हलकं राहतं, डकार कमी होतात आणि अन्न नीट पुढे जातं. (सक्रीय पचनक्रिया सुरू होते.)

4. गॅस देणारे पदार्थ मर्यादित करा → उदा. कडधान्य, ब्रेड, पनीर, कोल्ड ड्रिंक्स ज्यात fermentable sugars असतात, जे पोटात गॅस तयार करतात.

5. आठवड्यातून एक दिवस ‘पचनासाठी विश्रांती’ घ्या → उकळलेलं सूप, वाफवलेल्या भाज्या आणि हलकं जेवण पचनसंस्थेवरचा भार कमी करतात. (तुमच्या आतड्यांसाठी Reset day, जसं शरीरासाठी rest day असतो.)

6. रोज पचनसंस्थेची हालचाल करा → चालणं, ब्रीदिंग व्यायाम, twisting yoga poses यामुळे अंतर्गत अवयव हलतात, रक्तप्रवाह वाढतो आणि आतडं सुटसुटीत राहतं.

ब्लोटिंगवर तात्पुरती औषधं घेणं सोपं आहे, पण लक्षात ठेवा की चविष्ट अन्न नीट पचवणं तितकंच महत्वाचं आहे.

सवयी सुधारल्या की पोट फुगणं थांबते आणि आयुष्य हलकं होतं.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#bloating#digestion#gut-health#panchan#healthy-lifestyle#marathi-health
Share:WhatsAppXFacebook