General Health
Branded vs Generic औषधं – आधी परिस्थिती समजून घेऊया
औषधं चांगली की वाईट यावर चर्चा करण्याआधी, रुग्णाच्या अनुभवावर आधारित ४ वेगवेगळ्या परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच खरी चर्चा शक्य आहे.
👨⚕️ रुग्ण डॉक्टरकडे गेला: डॉक्टरांनी लिहिलं: Tab Azee (Azithromycin) 500mg
पुढे काय घडलं? ४ उदाहरणांमधून पाहूया:
1. रुग्णाला औषधाचं scientific नाव माहिती आहे. - केमिस्टला विचारतो: “ब्रँडेड options काय आहेत?” - विश्वसनीय कंपनीचं वाजवी किंमतीचं ब्रँड निवडतो. - निकाल: ब्रँडेड औषध मिळालं आणि खर्चही कमी झाला.
2. रुग्णाला औषध + कंपनीचं नाव (उदा. Cipla) माहिती आहे. - विचारतो: “Cipla चं ब्रँडेड आणि generic दोन्ही कितीला?” - त्याच कंपनीचं generic निवडलं — विश्वास + बचत. - निकाल: generic घेतलं पण गुणवत्ता टिकली.
3. डॉक्टरांनी फक्त ब्रँडेड नाव लिहिलं, scientific नाव नाही. - रुग्णाजवळ पर्याय नसतो, तेच औषध घ्यावं लागतं. - ही समस्या prescription पद्धतीची आहे, औषधाच्या प्रकाराची नाही.
4. औषध एकाच दुकानात उपलब्ध, इतरत्र नाही. - उपलब्धतेमुळे तोच ब्रँड घ्यावा लागतो. - ही समस्या market monopoly किंवा accessibility ची आहे.
हे चार परिस्थिती समजल्या शिवाय खरी चर्चा होऊ शकत नाही.
गोंधळ दूर करूया, मग निर्णय घेऊया.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts