Just For Hearts

Heart Health

Angioplasty / Bypass Surgery नंतर Cardiac Rehab करणं का गरजेचं?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Angioplasty / Bypass Surgery झाल्यानंतर तुम्ही discharge झालात, पण ही Recovery ची सुरुवात आहे, शेवट नाही!

Cardiac Rehabilitation म्हणजे डॉक्टर, physiotherapist, dietitian आणि psychologist यांच्या देखरेखीखाली चालणारा structured program ज्यामुळे bypass झालेल्या रुग्णांचं हृदय पुन्हा सक्षम होतं.

Rehab मध्ये नेमकं काय केलं जातं?

1. Functional capacity METs आणि 6-min walk टेस्टने मोजलं जातं.

2. व्यायामात Blood Pressure response किती वाढतो किंवा कमी होतो हे पाहिलं जातं.

3. Heart rate variability (HRV) मोजून हृदयाचं stress adaptability तपासलं जातं.

4. Weight आणि waist circumference fat loss साठी monitored केलं जातं.

5. Mental health status मध्ये depression आणि anxiety स्कोअर तपासले जातात.

6. Exercise protocol follow-up करून व्यायाम पातळी योग्य आहे का ते पाहिलं जातं.

7. Lifestyle adherence मध्ये आहार, झोप, smoking cessation यांचा समावेश असतो.

8. Lipid profile आणि sugar tracking केली जाते, ज्यात LDL, triglycerides, HbA1c यांचा समावेश आहे.

9. Medication adherence तपासली जाते की औषधं योग्य वेळेवर घेत आहेत का.

10. रोजच्या आयुष्यात परतण्याची तयारी (Return-to-work readiness) तपासली जाते.

सर्जरीने हृदयाचं रक्तप्रवाह चालू होतं, पण Cardiac Rehab हृदयाला पुन्हा धडधडतं करतं.

Bypass, Angioplasty किंवा Heart failure असलेल्या प्रत्येक रुग्णाने Cardiac Rehab करायलाच हवं. हे "Optional" नाही, "Essential" आहे.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#cardiac-rehab#bypass-surgery#angioplasty#heart-health#rehabilitation
Share:WhatsAppXFacebook