Heart Health
कोलेस्टेरॉल वाढलंय: Statin घ्यावं की थांबवावं?
कोलेस्टेरॉल वाढलंय…
Statin घ्यावं की थांबवावं? हा प्रश्न अनेक रुग्णांना सतावतो, पण उत्तर सगळ्यांसाठी सारखं नसतं!
✅ महत्त्वाचे 6 मुद्दे:
1. Statin फक्त कोलेस्टेरॉल कमी करत नाही, तर हृदयविकाराचा धोका देखील कमी करतो. जर LDL > 70–80 mg/dL असेल आणि Diabetes / smoking / कुटुंबाचा इतिहास असेल तर Statin सुरू करणे योग्य आहे.
2. lifestyle योग्य असेल तर काही वेळ Statin न घेता बघता येतो. दिवसातून 2–3 फळं, कमी साखर-तेल, चविष्ट पण घरीचा आहार, रोज चालणं, भारतीय डायट आणि व्यायाम सुधारल्यास तरुण रुग्णांना थोडा वेळ दिला जाऊ शकतो.
3. साइड इफेक्ट्स टाळता येतात. स्नायू दुखणे, थकवा यासाठी low dose, alternate day dose, किंवा दुसऱ्या प्रकारची Statin वापरता येते.
4. सहन न झाल्यास डॉक्टरांशी चर्चा करा, स्वतःहून बंद करू नका. दुसरा ब्रँड/मोलिक्युल, कमी डोस, आठवड्यातून 2–3 वेळा घेणं यामुळे सहनशीलता वाढते.
5. परिणाम हळूहळू पण खोलवर होतात. LDL कमी होण्यासाठी 4–6 आठवडे लागतात, आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यासाठी किमान 6 महिने लागतात.
6. अचानक Statin बंद करणे धोकादायक आहे. पूर्वी हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
📌 Statin रात्री झोपण्यापूर्वी घेणं जास्त फायदेशीर आहे.
🔬 Research काय सांगतो? LDL 40 mg/dL नी कमी झालं की हृदयविकाराचा धोका 20–25% नी कमी होतो, पण diet आणि व्यायाम नसेल तर फायदा अपुरा राहतो.
Statin ही shortcut नाही, ती एक “स्ट्रॅटेजिक औषध” आहे. पण lifestyle बदल हा कायमचा आधार आहे.
तुमचं मत काय? Statin घेत आहात? lifestyle ने फरक पडला का? कमेंट करा, शेअर करा, कुणाचं हृदय वाचू शकतं.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts