Cholesterol
दीर्घकालीन Care मध्ये औषधांबाबत स्पष्ट माहिती का आवश्यक आहे
औषधं चालू आहेत... पण माहिती कुठं आहे?
बीपी, कोलेस्टेरॉल, डायबेटिस, हार्ट अशा दीर्घकालीन आजारांमध्ये औषधं ही केवळ उपचार नव्हेत, ती रुग्णाच्या रोजच्या जगण्याचा भाग असतात.
मग त्या औषधांविषयी स्पष्ट, सोपी, रुग्णाभिमुख माहिती देणं ही उपचाराची एक गरजच का मानली जात नाही?
एक रुग्ण नुकताच टोकियोतील 6 महिन्याचा मुक्काम संपवून भारतात परत आला. तिथे त्याला त्याच औषधांचा कोर्स मिळाला, पण प्रत्येक गोळीबद्दल: - कोणते आजारासाठी आहे - कोणत्या वेळेस घ्यायचं - काय खाऊ नये - संभाव्य साइड इफेक्ट्स - आणि हे सगळं दोन भाषांमध्ये (इंग्रजी + जपानी)!
इथे भारतात मात्र अजूनही: - हस्तलिखित प्रिस्क्रिप्शन - ब्रँडवर भर - रुग्णाला काहीही न सांगता औषधं सुरू - आणि “तुम्ही pharmacist ला विचारा” असं उत्तर
या गोष्टींचा मोठा फटका कोणाला बसतो? रुग्णांना! - चुकीच्या वेळी औषधं घेणं - दुसऱ्या डॉक्टरांना समज न येणं - साइड इफेक्ट्सचा त्रास सहन करणं - आणि शेवटी उपचारात गोंधळ
Chronic Care म्हणजे फक्त औषधं लिहून देणं नाही, तर औषधं ‘समजावून’ देणं.
Data सांगतो की: भारतातील दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांमध्ये औषध पालनाची पातळी सुमारे 51% इतकी आहे. एकूण अँडहेरेन्स कमी असल्याने गुंतागुंत आणि खर्च वाढतो.
म्हणजे, औषध लिहून देणं पुरेसे नाही, समजावणं गरजेचं आहे.
रुग्ण म्हणून तुमचा हक्क आहे: - तुमच्या प्रत्येक गोळीची माहिती विचारण्याचा - सॉफ्ट कॉपी / टाइप केलेल्या प्रिस्क्रिप्शनची मागणी करण्याचा - पर्यायी ब्रँड / किफायतशीर पर्याय जाणून घेण्याचा
डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी आहे: - ‘Drug counselling’ ला वेळ देण्याची - रुग्ण शिक्षणाचा भाग बनवण्याची - आणि केवळ उपचार नव्हे, तर विश्वास देण्याची
आजपासून आपण ही सवय लावूया, औषधं दिली की, 2 मिनिटांत तरी माहितीही द्या.
तुमचं मत काय? रुग्ण, डॉक्टर, केमिस्ट, तुमचे अनुभव, अडचणी, विचार, सूचना नक्की comments मध्ये शेअर करा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts