General Health
Test Reports नसलं तरीही तुमचं शरीर रोज 'तुम्ही ठीक आहात' असं सांगत असतं!
तुमचं शरीर कधीच गप्प बसत नाही. दररोज ते काही ना काही संकेत देत असतं की "अरे, सगळं व्यवस्थित आहे!" पण आपण ते लक्षात घेतो का?
आरोग्याचं रोजचं सुखदायक confirmation म्हणून खालील 10 लक्षणं लक्षात ठेवा: 1. सकाळी उठल्यावर हलकं वाटणं 2. नियमित आणि सहज मलविसर्जन 3. नैसर्गिक भूक वेळेवर लागणं 4. जेवल्यानंतर गॅस किंवा अॅसिडिटी न होणं 5. लघवी नियमित आणि पारदर्शक असणं 6. दिवसभर ऊर्जेचा flow जाणवणं 7. रात्री शांत झोप लागणं 8. थोडं चालल्यावर दम लागू न येणं 9. मूड बराचसा स्थिर राहणं 10. थोड्या गडबडीतूनही सहज सावरता येणं
हीच खरी "Internal Health Report" आहे, जी तुम्हाला रोज मोफत मिळते!
तुमच्याकडे यापैकी किती लक्षणं आहेत? कमेंट करा आणि एखाद्याला आजच आत्मविश्वास द्या!
जर तुम्ही हे अनुभवत असाल, तर काळजीचं काही कारण नाही. तुमचं शरीर उत्तम रितीने साथ देत आहे!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts