Fitness
Dead Hang: शरीराला “reset” देणारा साधा पण प्रभावी व्यायाम
Dead Hang: शरीराला “reset” देणारा साधा पण प्रभावी व्यायाम
आजचं काम: फक्त बार पकडा… आणि काही सेकंद लटका.
इतकं साधं पण परिणाम खोलवर जाणवतात.
का करायचं? (हेच कारण पुरेसं आहे)
1. पाठीवरचा Spine load कमी होतो, दिवसभर बसण्याचा परिणाम कमी होतो. 2. कंबरदुखी, मानदुखी हलकी वाटायला मदत होते. 3. हातांची Grip Strength वाढते, Aging मध्येही खूप महत्त्वाची आहे. 4. Core आणि Balance सुधारतो. 5. Posture (उभं राहणं / बसणं) सुधारायला मदत होते. 6. Pull-ups, Push-ups साठी शरीर तयार होतं. 7. Muscles, Joints आणि Bones “Load सहन” करायला शिकतात.
थोडक्यात, तुमचं शरीर पुन्हा Strength ने काम करायला शिकतं.
कसं करायचं? (आजपासून सुरू करा)
* 15–30 सेकंद लटकून सुरू करा. * हळूहळू 45–60 सेकंदांपर्यंत वाढवा. * 2–3 Sets (वेळा) करा. * आठवड्यात किमान 3–4 दिवस.
विज्ञान सांगतं: आठवड्याला 6–10 मिनिटं Hanging, Grip Strength आणि Spine Health साठी पुरेसं आहे.
Diet perfect नसलं तरी चालेल… Gym नसलं तरी चालेल… पण शरीराला लटकायला शिकवा. ते तुम्हाला मजबूत बनवेल.
आजच करा! आणि तुमचा पहिला प्रयत्न, किती सेकंद? जरूर सांगा.
Strength doesn’t need Complexity… it needs Consistency. Hang daily, and let your body rebuild itself.
काळजी: Shoulder, Wrist किंवा Severe Back Pain असल्यास आधी सल्ला घ्या. दुखत असेल तर थांबा — हळूहळू प्रगती करा.
Dr Ravindra L Kulkarni