Just For Hearts

General Health

गावकऱ्यांचं प्रेम असलेला पण सिस्टिमने डावललेला डॉक्टर

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"सर, जाऊ नका..." गावकऱ्यांचं प्रेम, पण सिस्टिमने डावललेला डॉक्टर.

प्रामाणिकतेला मान न देणाऱ्या व्यवस्थेचा कटू अनुभव... एका PHC डॉक्टरचं वास्तव.

🏥 पोस्टिंग: PHC मोरोची, सोलापूर जिल्हा MBBS नुकतंच पूर्ण झालं होतं. सरकारची Rural Bond सेवा सुरू झाली. Class 2 Gazetted Medical Officer म्हणून नियुक्ती, नाव 'गॅझेटेड', पण अनुभव? पूर्णपणे अदृश्य.

✨ एकीकडे: सेवा, समाधान, आपुलकी

गावातच राहणं, शाळांमध्ये तपासण्या, महिलांचं आरोग्य, आणि सर्वात खास म्हणजे संत ज्ञानेश्वर पालखीच्या मार्गावर सोलापूर जिल्हा प्रवेश वेळी PHC म्हणून विशेष जबाबदारी.

वारकऱ्यांशी संवाद, आणि गावाचा 'आपला डॉक्टर' म्हणून आत्मीय स्वीकार. Job Satisfaction: 💯

⚠️ दुसरीकडे:

अपमान, हस्तक्षेप, दुःख ब्लॉक-डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या बैठकीत अपमानास्पद वागणूक. लोकप्रतिनिधींचं उद्धट बोलणं, "कळत नाही तुम्हाला, आमचंच ऐका." न लिहिता-वाचता येणाऱ्यांकडून चौकात अपमान. PHC मध्ये 24 तास सेवा देऊनही, डॉक्टर असणं गुन्ह्यासारखं वाटायला लागलं.

🤝 गावकऱ्यांचं प्रेम हेच खरं वैभव

पोस्टिंग संपत आली. ससून ला ट्रान्सफर होणार हे कळल्यावर स्थानिक नेते स्वतः भेटायला आले. "सर, जाऊ नका... आम्ही तुमचं ट्रान्सफर रद्द करून टाकतो!" ते प्रेम, आदर, आणि निरागस भावनेनं भरलेलं होतं, राजकीय नव्हतं.

‘लोकप्रतिनिधी’ सन्माननीय असतात... पण ‘लोकसेवक’ही कमी नाहीत.

मी एकटाच नव्हतो, कृषी अधिकारी, शिक्षक, विस्तार अधिकारी सगळेच असंच अनुभवत होते. तेव्हा वाटायचं IAS/IPS असाल तरच सन्मान, MBBS म्हणजे छोटं पद. असं वाटायचं की सन्मान फक्त मोठ्या खुर्च्यांनाच मिळतो, उरलेले फक्त काम करणारे असतात. आता वाटते की तेव्हा मी फारचं निरागस व भोळा होतो.

आज दोन दशकांनंतरही शिक्षण, प्रामाणिकपणा, मेहनतीला व्यवस्थेत सन्मान नाही. आणि त्यावर निर्लज्जतेचा कळस म्हणजे काही अति-उत्साही कार्यकर्ते मेहनती अधिकाऱ्यांचं शिक्षण, परीक्षा, जात प्रमाणपत्र तपासण्याची मागणी करत आहेत.

MD झाल्यावर परत सरकारी सेवेत यावं असं मनापासून वाटलं होतं. पण त्या अनुभवांनी ती इच्छा खुंटली. चांगल्या डॉक्टरांची गरज आजही आहे, पण काम करू देणारी सिस्टिम नाही.

आजही त्या गावाशी नातं तसंच आहे. अलीकडे एका सहकाऱ्याच्या कन्येच्या लग्नासाठी PHC ला गेलो... आठवणी जाग्या झाल्या.

#phc#rural-posting#solapur#doctor-experience#healthcare#public-service#medical-officer
Share:WhatsAppXFacebook