Nutrition
जेवण तेच, प्रमाणही तेच… पण खाण्याचा वेग शरीरावर फरक करतो का?

जेवण तेच, प्रमाणही तेच… पण 10 मिनिटांत खाणं आणि 30 मिनिटांत खाणं यात शरीरासाठी फरक पडतो का?
"डॉक्टर, मी घरचंच जेवतो. पोळी, भाजी, डाळ, भात सगळं व्यवस्थित. तरी वजन कमी होत नाही!"
मी विचारलं, "जेवायला किती वेळ घेता?"
उत्तर आलं, "10 मिनिटं! Office मध्ये घाई असते. घरी TV पाहत जेवण होतं."
आपण काय खावं आणि किती खावं यावर भरपूर चर्चा करतो.
पण किती वेगाने खातो, किती लक्ष देऊन खातो आणि पोट भरल्याचं कधी ओळखतो, याकडे किती लक्ष देतो?
1️⃣ पोट भरल्याचा Signal मेंदूपर्यंत कसा पोहोचतो?
जेवताना पोट ताणलं जातं. पोट आणि आतड्यांमधून मेंदूपर्यंत विविध Signals पोहोचतात.
यात काही महत्त्वाचे Hormones सहभागी असतात:
🔹 Ghrelin: भूक वाढवणारा Hormone. जेवणापूर्वी त्याची पातळी साधारण वाढते.
🔹 GLP-1 आणि PYY: जेवणानंतर तृप्ती वाढवण्यास मदत करणारे Gut Hormones.
🔹 Leptin: शरीरातील Fat Stores आणि दीर्घकालीन Energy Balance बद्दल मेंदूला माहिती देणारा Hormone.
म्हणजे तृप्ती ही फक्त पोट भरण्याची गोष्ट नाही; ती पोट, आतडी आणि मेंदू यांच्यातील संवाद आहे!
2️⃣ मग जेवायला किती वेळ द्यावा?
इथे विज्ञान आणि व्यवहार दोन्ही समजून घेऊया.
जलद खाणाऱ्या व्यक्ती एका जेवणात तुलनेने अधिक Calories घेऊ शकतात, असं संशोधन दर्शवतं.
कारण वेगाने खाताना पुरेसं झालं आहे का, याकडे लक्ष देण्याची संधी कमी मिळू शकते.
20–30 मिनिटं निवांत जेवणासाठी राखून ठेवणं ही चांगली व्यवहार्य सवय आहे.
मात्र तृप्तीचा Signal नेमका 20 मिनिटांनीच सुरू होतो, असं नाही. Signals जेवताना सुरू होतात आणि त्यांचा प्रतिसाद व्यक्तीनुसार बदलतो.
महत्त्वाचं म्हणजे घाईघाईत जेवण संपवू नका; पण घड्याळ पाहत जबरदस्तीने 30 मिनिटं बसण्याचीही गरज नाही!
3️⃣ हळू खाल्ल्याने Sugar आणि Weight दोन्ही सुधारतात का?
Weight Management साठी: हळू खाण्यामुळे काही व्यक्तींमध्ये एका जेवणातील अन्नाचं प्रमाण कमी होऊ शकतं. पण त्याने आपोआप वजन कमी होत नाही.
Blood Sugar साठी: खाण्याचा वेग हा एकमेव निर्णायक घटक नाही.
जेवणातील Carbohydrates चं प्रमाण, Protein, Fibre आणि संपूर्ण Meal Composition अधिक महत्त्वाचे असतात.
आणखी एक उपयुक्त मुद्दा:
भाजी/सलाड आणि Protein-rich पदार्थ आधी, Carbohydrates नंतर खाल्ल्यास काही व्यक्तींमध्ये जेवणानंतरची Sugar वाढ कमी होऊ शकते.
यावर आपण स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा करू.
4️⃣ Distracted Eating - जेवण चालू असतं, पण लक्ष कुठे असतं?
एक परिचित प्रसंग…
TV सुरू आहे. Mobile वर Video चालू आहे. जेवणही सुरू आहे.
कधी ताट संपतं, कधी दुसरी वाढ घेतो, ते लक्षातही येत नाही!
याला Distracted Eating - जेवताना लक्ष दुसरीकडे असणं म्हणतात.
संशोधनानुसार विशेषतः TV सारख्या Distractions मुळे काही परिस्थितींमध्ये अधिक खाणं होऊ शकतं. पुढच्या खाण्याच्या वेळीही अन्नाचं प्रमाण वाढण्याचा संबंध दिसला आहे.
कधीकधी जेवणाचा वेग कमी करण्यापेक्षा जेवणाकडे लक्ष देणं ही पहिली महत्त्वाची सुधारणा असते.
5️⃣ पुढील 3 जेवणांत एक छोटा बदल!
Diet बदलण्याची गरज नाही. फक्त:
✅ Slow Down: जेवणासाठी निवांत वेळ ठेवा. घास नीट चावून खा.
✅ Screen Away: शक्यतो Mobile आणि TV बाजूला ठेवा.
✅ Notice Fullness: दुसरी वाढ घेण्यापूर्वी थोडं थांबा. अजून भूक आहे का पाहा.
जेवण संपल्यावर एकच प्रश्न विचारा:
"मी पोट भरलं म्हणून थांबलो, की ताट संपलं म्हणून?"
आपल्यापैकी अनेकांना आपण दिवसभर नेमकं काय आणि किती खातो, याचाही अंदाज नसतो.
Just For Hearts App मधील ‘My Plate’ मध्ये दिवसभर खाल्लेल्या पदार्थांची नोंद ठेवता येते. इच्छुकांनी एक आठवडा नोंदी करून पाहाव्यात. आपल्या खाण्याच्या सवयी समजून घेण्यासाठी त्या उपयोगी ठरू शकतात.
या नोंदींच्या आधारे आमच्या सहकारी दिव्या सांगलीकर (15+ वर्षांचा अनुभव असलेल्या Well known Nutritionist) आणि त्यांची Nutrition व Metabolic Coaching Team तुमच्याशी अधिक नेमकी चर्चा करून योग्य बदल सुचवू शकतात.
कारण चांगला Dietary Advice देण्यासाठी केवळ काय खायला हवं हे सांगण्यापेक्षा, व्यक्ती प्रत्यक्षात काय खाते, कसे खाते हे समजणंही महत्त्वाचं असतं.
जेवणाचं प्रमाण, वारंवार भूक लागणं, Weight किंवा Sugar Management बद्दल प्रश्न असल्यास, किंवा Nutrition Team च्या मार्गदर्शनाची माहिती हवी असल्यास JFH ONE: 92097 42597 WhatsApp Chat Only.
"Healthy Eating Is Not Only About What You Eat, But Also How You Eat."
"आरोग्यदायी आहार म्हणजे फक्त ताटात काय आहे हे नाही… तर ते आपण कसं खातो, हेही महत्त्वाचं!"
Clinical practice मध्ये अनेकदा असं जाणवतं:
काही व्यक्तींना नवीन Diet Chart देण्याआधी त्यांचं जेवणाशी असलेलं नातं समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं.
पुढच्या जेवणात थोडं सावकाश खाऊन पाहा.
कदाचित ताटात काहीही न बदलता, जेवणाचा अनुभव बदलू शकेल!
Observe the Pattern. Change the Course.
टीप: Eating Speed सुधारण्याचा सल्ला हा संतुलित आहार, आवश्यक औषधं किंवा वैयक्तिक Medical Nutrition Advice यांचा पर्याय नाही.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB FSCAI Cardiology Senior Consultant Physician & Cardiologist Just For Hearts