Just For Hearts

Diabetes

एक आंबा खाल्ल्याने काय होते डॉक्टरांच्या दृष्टीने

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"एक आंबा खाल्ल्याने काय होते डॉक्टर?" हे वाक्य दर उन्हाळ्यात OPD मध्ये अनेकदा ऐकायला मिळते.

मी कधीच आंब्याला पूर्ण बंदी घालत नाही. चव, आनंद, आठवणी हेही आयुष्याचा भाग आहेत.

पण portion control, discipline आणि शरीराची मर्यादा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

गेल्या आठवड्यातला एक प्रसंग अजून मनातून जात नाही.

75+ वर्षांचे diabetic patient repeatedly सांगूनही आंब्याचं अतिप्रमाणात खाणं थांबत नव्हतं.

ते हसत म्हणायचे, "पुढच्या वर्षी आंबा खायला असेन की नाही, कोण जाणे..."

नंतर अचानक तब्येत बिघडली.

Sugar 500+ वर होता.

छातीत infection आणि pneumonia झाला.

Best antibiotics सुरू केले गेले, पण शरीर साथ देत नव्हतं.

Condition worsen झाली, ventilator लागला, आणि शेवटी त्यांना वाचवता आलं नाही.

एक doctor म्हणून अशा वेळी सर्वात जास्त वेदना कशाची होते माहित आहे?

आजाराची नाही...

तर अनेकदा doctor, family, caregivers सगळे समजावत असतानाही काही रुग्ण स्वतःच्या शरीराचं ऐकायला तयार नसतात याची.

Diabetes मध्ये प्रश्न "आंबा खायचा का नाही?" हा नसतो...

प्रश्न असतो "आपण शरीराच्या मर्यादा मान्य करतो का?"

कारण काही चुका report मध्ये दिसतात...

आणि काही थेट ICU मध्ये जातात.

काही गोष्टी औषधांनी control होतात...

पण काहींसाठी self-control लागतो.

(सत्य घटनेवर आधारित)

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology

#diabetes#mango#self-control#blood-sugar#patient-care#health-advice
Share:WhatsAppXFacebook