Just For Hearts

Lifestyle

Non-veg घेतो म्हणजे Metabolism protection नाही

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Non-veg घेतो म्हणजे Metabolism protection नाही. समजून घेऊ या.

1. Non-veg चे advantage काय आहे? Egg, chicken, fish मध्ये protein density जास्त असते आणि amino acid profile पूर्ण असतो. Leucine threshold सहज गाठता येतो जो muscle protein synthesis साठी महत्त्वाचं आहे.

2. पण “non-veg diet” म्हणजे pure protein नसतो. भारतातील non-veg plate हा mix plate असतो. भात/पोळी / भाकरी / रोटी + ग्रेव्ही + तेल + मसाले. Protein सोबत calories, saturated fat, sodium सुद्धा वाढू शकतात.

3. Portion vs preparation 150 g grilled fish म्हणजे 150 g deep-fried fish होत नाही. Cooking method metabolic outcome बदलतो. High-fat gravies आणि repeated oil heating metabolic stress वाढवतात.

4. Processed meat trap Sausage, salami, nuggets “protein” म्हणून विकले जातात. WHO data नुसार processed meats cardiovascular risk शी संबंधित आहेत. Metabolic health साठी minimally processed sources निवडावेत.

5. Fibre gap Non-veg dominant plate मध्ये vegetables आणि fibre कमी पडतात. Low fibre → post-meal glucose spike जास्त. Protein आहे म्हणून metabolic stability आपोआप येत नाही.

6. “Only protein” हा mindset चुकीचा. Metabolism हा macronutrient balance वर चालतो. High protein + low fibre + excess calories हा metabolic advantage देत नाही.

7. Sarcopenia / muscle loss Animal proteins leucine rich असतात, वयस्कर लोकांमध्ये / aging population मध्ये muscle preservation साठी मदत होऊ शकते. पण त्याच बरोबर quantity, timing आणि resistance stimulus equally महत्त्वाचे.

8. Heart & Diabetes patients Lean sources (fish, egg white, skinless chicken) practical असतात. परंतू patients चे lipid / kidney चे reports लक्षात घेणे पण गरजेचे. स्वत:च high-protein घेतल्याने निर्माण झालेले complications OPD मध्ये बघायला मिळतात.

9. Non-veg “must” नाही. Planned vegetarian diet देखील adequate protein देऊ शकतो. Diet label महत्त्वाचा नाही.

माझे मत: Non-veg advantage आहे पण discipline नसलेला non-veg diet metabolic नुकसान करू शकतो. Protein source पेक्षा portion, preparation, fibre balance आणि muscle stimulus महत्त्वाचा. “मी non-veg खातो” हा metabolic insurance नाही. Lean source + fibre + portion control + muscle care हेच metabolic protection.

तुमच्या non-veg plate मध्ये balance आहे का? - Lean + भाज्या - फक्त ग्रेव्ही - सुधारतोय - विचारच केला नाही

पुढील भाग: Protein powder science vs marketing.

#metabolism#protein#non-veg#diet#muscle-health#fibre#nutrition#lifestyle-medicine
Share:WhatsAppXFacebook