Just For Hearts

Lifestyle

रात्री उशिरा खाल्ल्यावर शरीरात नेमकं काय होतं?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

रात्री उशिरा खाल्ल्यावर शरीरात नेमकं काय होतं?

CGM series मध्ये एक pattern वारंवार दिसतो:

दिवसभर sugar stable (नियंत्रित) असते… पण: - रात्री 10-11-12 वाजता जेवण - midnight snacking (रात्री मधे खाणं) - binge eating (एकदम जास्त खाणं)

नंतर spikes वाढतात आणि दुसऱ्या दिवशी: - heaviness (जडपणा) - acidity (अम्लपित्त) - poor sleep (कमी झोप) - सकाळची sugar जास्त

हा pattern आता खूप common होत चाललाय.

शरीर रात्रीच्या वेळी दिवसासारखं metabolically efficient (ऊर्जा प्रक्रिया कार्यक्षम) नसतं.

1. रात्री insulin sensitivity (इन्सुलिनचा परिणाम) नैसर्गिकरीत्या कमी होऊ शकतो.

म्हणजे same food (तेच अन्न) शरीराला process (प्रक्रिया) करायला जास्त कठीण जाऊ शकतं.

म्हणून काही लोकांमध्ये: - spikes जास्त - recovery slow - fasting sugar सकाळी जास्त

असं दिसू शकतं.

2. रात्री मुख्यतः: - repair (दुरुस्ती) - hormone balance (hormones संतुलन) - recovery (पुनर्बांधणी)

साठी शरीर तयार होत असतं.

पण late dinner (उशिराचं जेवण) मुळे body ला digestion (पचन) आणि recovery दोन्ही एकाच वेळी करावं लागतं.

हा metabolic overload (ताण) असू शकतो.

3. Research मध्येही circadian rhythm (शरीराचं जैविक घड्याळ) आणि metabolism यांचा मजबूत संबंध दिसतो.

रात्री: - glucose tolerance (साखर सहन करण्याची क्षमता) कमी होऊ शकते - fat storage (चरबी साठवण) वाढू शकते - hunger hormones बदलू शकतात

म्हणून काही लोकांमध्ये: - belly fat - fatty liver - insulin resistance

हळूहळू वाढताना दिसू शकतं.

4. आजकाल अनेक लोक: - दिवसभर stress मध्ये असतात - जेवायला उशीर करतात - आणि शरीर “shutdown mode” मध्ये जाण्याआधी overload करतात

म्हणून काही वेळा problem फक्त food मध्ये नसून timing मध्ये असतो.

5. म्हणून काही लोक म्हणतात “मी फार खात नाही… पण weight कमी होत नाही.”

कारण metabolism हा फक्त “किती खाल्लं” याचा विषय नाही.

तो: - “कधी खाल्लं” - “किती उशिरा खाल्लं” - “खाऊन लगेच झोपलो का”

याचाही विषय आहे.

6. CGM मध्ये काही वेळा एक interesting pattern दिसतो: Late dinner नंतर: - sugar जास्त वेळ high राहते - overnight recovery slow होते - आणि सकाळची fasting sugar बदलते

हे अनेक वेळा early metabolic stress (ताण) चं sign असू शकतं.

7. मग उपाय फक्त “कमी खाणं” आहे का? नक्कीच नाही परंतू काही वेळा: - dinner timing सुधारल्यावर - sleep सुधारल्यावर - quantity कमी केल्यावर - dinner नंतर हलकी walk केल्यावर

patterns visibly improve होताना दिसतात.

8. CGM मधला सर्वात powerful lesson कोणता? शरीर रात्री काय tolerate (सहन) करतं… आणि काय struggle करतं… हे numbers पेक्षा pattern मधून जास्त समजतं.

अनेक वेळा diet change पेक्षा dinner timing change जास्त powerful ठरू शकतो.

Problem शरीराला rest (विश्रांती) मिळण्याआधीच पुन्हा कामाला लावण्यात असते.

हा post उशिरा जेवणाऱ्या व्यक्तीला नक्की share करा.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#late-night-eating#sugar-spikes#metabolic-health#insulin-sensitivity#circadian-rhythm#dinner-timing
Share:WhatsAppXFacebook