Lifestyle
या गणेश चतुर्थीत मोदक आनंदाने खा, guilt नको
आज आरोग्याचा फारसा बाऊ नको, मोदक मनापासून खा!
आज ‘काय खावं काय नाही’, असं सांगायला आलो नाही. गणपतीबाप्पा आलेत आणि मोदक हा खायचाच असतो… मनापासून!
का खावा मोदक?
1. सण वर्षातून एकदाच येतो, आज आरोग्याचं गणित बाजूला ठेवा. → एक दिवस गोड खाल्लं, तर काही बिघडत नाही.
2. मोदक पोषण देतो का नाही हा वेगळा विषय, पण मन मात्र भरून टाकतो. → गूळ, नारळ, तूप सगळं आठवणींचं मिश्रण आहे.
3. मोदक म्हणजे घरची चव, आईच्या हातचा स्वाद. → हाच खरा सणाचा आनंद असतो.
4. एकत्र जेवताना मिळणारी मजा हीच immunity आहे. → हास्य, गप्पा, आणि प्रेम यांचं औषध नाही!
5. डायबेटीस, वजनाचं लक्ष असेल तरी आज मनाला थांबवू नका. → औषधं वेळेवर घ्या, थोडं चालून घ्या पण guilt नाही!
6. मर्यादा हव्या असतील, ठेवा पण खाण्यावर नाही, विचारांवर ठेवा.
7. मोदक खाल्ल्यावर जो आनंद मिळतो, तो गोळ्यांनी मिळत नाही.
8. सणाचा आनंद एक दिवसाचा असतो, पण HbA1c पुन्हा कंट्रोल करता येतो.
9. डॉक्टरांचं ऐका, पण मनाचं ऐकणं अजून महत्त्वाचं.
10. मोदक किती खाल्ले हे लक्षात राहत नाही… → पण ‘कोणासोबत खाल्ले’ हे कायम आठवतं!
आज ना कोणाला उपदेश, ना नको ते guilt. ना sugar-free चा आग्रह, ना control ची सक्ती. फक्त एवढंच सांगतो “हसून, खेळून, प्रेमानं खा आजचा दिवस आयुष्यासाठी ठेवा, आजारासाठी नाही.”
💫 गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून आनंद, आरोग्य आणि मोदक प्रेम देवो!
खाऊन घ्या आणि जगून घ्या!
हा पोस्ट वाचला ना? आता तुमच्या ‘फॅमिली’, ‘कॉलनी’, आणि ‘गणपती ग्रुप’मध्ये लगेच शेअर करा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts