General Health
कॅन्सरविरुद्धची लढाई आता नव्या वळणावर: EnteroMix mRNA Vaccine
कॅन्सरविरुद्धची लढाई आता नव्या वळणावर आली आहे, कारण रशियामधून विकसित झालेली EnteroMix नावाची mRNA आधारित कॅन्सर Vaccine आशादायक सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दाखवत आहे.
1. EnteroMix ही रशियामधून विकसित केलेली mRNA आधारित Vaccine आहे जी कॅन्सरवर लक्ष केंद्रित करते.
2. ही Vaccine वैयक्तिकरित्या तयार केली जाते, म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमरप्रमाणे शरीराला प्रशिक्षण दिले जाते.
3. सध्या फक्त Phase 1 चाचणी पूर्ण झाली आहे, मोठ्या चाचण्या अजून बाकी आहेत.
4. ही Vaccine Colorectal, melanoma, glioblastoma अशा कॅन्सर प्रकारांवर लक्ष केंद्रित करते.
5. औपचारिक मंजुरीची प्रक्रिया सुरू असून, कॅन्सरग्रस्तांसाठी ही नवी आशा आहे.
EnteroMix ही पारंपरिक रोग प्रतिबंधक Vaccine नाही, तर वैयक्तिकृत mRNA उपचारात्मक Vaccine आहे जी कॅन्सर झाल्यानंतर दिली जाते. ती पेशंटच्या ट्युमरच्या जनुकांनुसार तयार केली जाते आणि शरीराला त्या विशिष्ट कॅन्सर पेशींविरुद्ध लढण्यास शिकवते, विशेषतः कोलोरेक्टल कॅन्सरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी.
❤️ “जेव्हा सगळं संपतंय असं वाटतं, तेव्हाच कुठेतरी एक नवी पहाट उगवत असते. EnteroMix ही त्या पहाटेची आशा आहे!”
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts