Diabetes
Diabetes असताना सुरक्षितपणे उपवास कसा कराल
Diabetes असताना उपवास? हो, पण जाणून–समजून!
सुरक्षितपणे उपवास कसा कराल? खाली काही मार्गदर्शन आहे:
1. एकदिवसीय उपवास - सामान्यतः सुरक्षित. रात्री हलकं जेवा आणि सकाळी काय खाणार ते ठरवा.
2. सलग उपवास (नवरात्र/एकादशी) - रोज साखर तपासा. औषधं स्वतःहून थांबवू नका. डोस बदल डॉक्टर ठरवतील.
3. Sulfonylurea किंवा Insulin वापरताय? Low sugar चा धोका आहे. डोस कमी करायचा का ते डॉक्टर ठरवतील.
4. SGLT2 औषधं (Dapa/Empa) घेत असाल तर शरीरातून पाणी जातं. त्यामुळे उपवासात डिहायड्रेशनचा धोका टाळा.
5. GLP-1 (Semaglutide) - भूक कमी होते आणि उपवास सोपा होतो. पाणी प्या, अपचन व उलटी टाळा.
6. काय पिऊ शकता? नारळपाणी, ताक, दूध, फळरस (उपवासानुसार मान्य). प्रमाण ठेवा, ऊर्जादायक आणि सुरक्षित.
7. पाणी = उपवासाचं इंधन! दिवसात 2.5–3 लिटर प्या. दर 1–2 तासांनी थोडं थोडं प्या, तहान लागली नसली तरी.
8. घाम, चक्कर, भूक, अंधारी अशी लक्षणं दिसली तर उपवास थांबवा. हे Low sugar चा इशारा आहे. गोड द्रव घ्या आणि उपवास सोडा, संकोच करू नका.
9. उपवास म्हणजे संयम आणि समजूतदारपणा. श्रद्धा ठेवा पण भीती नको. डॉक्टर, डायटिशियन आणि तुमच्या शरीराशी संवाद ठेवा.
उपवास वर्ज्य नाही, पण बिनधास्तही नाही.
माहिती + औषध समज + पथ्ये = सुरक्षित उपवास!
मी स्वतः उपवासाला पाठिंबा देतो, ही आरोग्यशिस्त आहे. योग्य रीतीने उपवास केल्यास शरीरालाही फायदा होतो!
ही माहिती WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा. कोणाच्या श्रद्धेला सुरक्षा आणि समज मिळेल.
Follow करा, सुरुवात करा, आणि तुमचा अनुभव शेअर करा!
Dr. Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI (Cardiology) Just For Hearts