Just For Hearts

Fitness

गड-किल्ले – शरीरासाठी व्यायामशाळा, मनासाठी प्रेरणा!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

गड-किल्ले हे शरीरासाठी आणि मनासाठी नैसर्गिक व्यायामशाळा आहेत.

आज अनेक जण नियमित गड-किल्ले चढतात, पण काही अजूनही विचार करतात, "आपण करू शकतो का?"

हो, नक्की करू शकता. आणि आजच सुरुवात करा!

1. सिंहगड, पन्हाळा, राजगड, रायगड, लोहगड यांसारखे गड नैसर्गिक Gym आहेत. त्यावर चढल्याने Strength, Cardio आणि Endurance वाढते.

2. हातात काठी, पाठीवर पाण्याची बॅग आणि डोक्यात छत्रपती शिवराय यांचा विचार करत असताना हा व्यायाम फारच Powerful होतो.

3. व्यायाम न करणाऱ्यांसाठीही हा perfect start आहे – कोणतेही machines नाहीत, कोणतेही excuses नाहीत!

4. सतत चढ-उतारामुळे पायातील ताकद, फुफ्फुसांची capacity आणि VO2 Max वाढते.

5. स्नायूंना प्रत्यक्ष कामाची सवय लागते – येथे gym सारखा cheat day नाही! आणि हो, खाल्लेलं व्यवस्थित पचतं – guilt-free Sunday!

6. सूर्यप्रकाश, थंड हवा आणि हिरवळ हे नैसर्गिक mood booster आणि Vitamin D देतात.

7. एकदा consistency आली की fit राहणं हे trend नाही, तर "नविन नॉर्मल" बनतं.

8. नियमित गड-किल्ले चढल्याने वजन कमी होणं आणि ऊर्जा वाढणं हे side effects होतात.

9. गड-किल्ले इतिहासाचे साक्षीदार आणि तुमचे मजबूत fitness coach आहेत.

10. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड फक्त लढायांचे स्मारक नाहीत, तर आजच्या पिढीसाठी प्रेरणा, आरोग्य आणि जबाबदारीचं प्रतीक आहेत.

अलीकडे १२ गड किल्ले World Heritage यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यांना स्वच्छ, शांत आणि सन्मानपूर्वक जपणं आपलं कर्तव्य आहे.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#forts#fitness#natural-workout#strength#endurance#cardio#heritage#motivation
Share:WhatsAppXFacebook