Lifestyle
FSSAI चर्चेत आहे… पण आपले अन्न खरंच regulated आहे की फक्त labelled?
FSSAI चर्चेत आहे… पण खरा प्रश्न असा आहे की, आपण जे अन्न खातो ते खरंच regulated आहे की फक्त labelled आहे?
एक senior clinician म्हणून, दररोज OPD मध्ये जे दिसतं ते स्पष्ट आहे:
Diabetes, obesity, fatty liver, BP, Cholesterol हे आता वैयक्तिक प्रश्न राहिलेले नाहीत. हे system-driven public health crisis आहे.
एक प्रामाणिक निरीक्षण:
प्रयत्न सुरू आहेत… पण ते पुरेसे वाटत नाहीत.
Guidelines आहेत… पण त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या रोजच्या खाण्यावर दिसायला हवा.
इथे regulator आणि policy makers दोघांची accountability स्पष्ट असली पाहिजे.
आजचा food environment कसा आहे?
1. Packaged foods, cloud kitchens, food delivery apps 2. Convenience food = रोजचं खाणं
आणि इथेच समस्या सुरू होते:
* Hidden sugar (maltodextrin, corn syrup इ.) * “Sugar-free” लिहिलं असलं तरी शरीरावर साखरेसारखाच परिणाम होतो. * High calories पण पोट न भरणारं खाणं. * Portion size मोठं असते, नकळत जास्त खाल्लं जातं.
फक्त माणूस चुकीचा नाही… environment त्याला चुकीकडे ढकलतं.
मग अपेक्षा नेमक्या काय असाव्यात?
1. Front-of-pack clear labelling: साखर, मीठ, trans fat, calories हे सगळे एक नजरेत समजेल अशी माहिती असावी. 2. Hidden ingredients transparency: “No added sugar” म्हणजे healthy असंच नसतं. refined carbs स्पष्ट लिहिले पाहिजेत. 3. Ultra-processed foods classification: सोपं grading system (A/B/C किंवा रंग कोड) लोकांना योग्य choice करता येण्यासाठी मदत. 4. Digital food ecosystem regulation: food apps, cloud kitchens वर calories आणि ingredients स्पष्ट दाखवणं आवश्यक. 5. Advertising accountability: “Heart healthy”, “Diabetic friendly” scientific proof शिवाय असे claims नसावेत. 6. Technology-enabled enforcement: AI tracking, QR code traceability, batch checking वापरले पाहीजे. आज capability आहे; आता consistency आणि intent आवश्यक आहे. 7. Right to informed eating: आपण बाहेरचं खाणं पूर्ण टाळू शकत नाही, पण आपण काय खातोय हे समजणं हा प्रत्येकाचा basic health right आहे.
का महत्त्वाचं आहे?
Hidden sugar + hidden calories = insulin resistance → fatty liver → diabetes → heart disease
ही chain OPD मध्ये रोज दिसते.
My Opinion:
जर labelling, monitoring, आणि regulation strict आणि transparent झाले… तर lifestyle diseases चा burden लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो.
पण आज आपण काय करतो?
आजार वाढले की hospitals वाढवतो. ICU beds वाढवतो. हे आवश्यक आहे… पण हे उपचार आहेत, उपाय नाहीत.
खरा उपाय prevention आहे. आणि prevention policy पासून सुरू होतं.
“Lifestyle diseases विरुद्धची लढाई clinic मध्ये जिंकली जात नाही… ती योग्य policy decisions मध्ये जिंकली जाते.”
हा विषय प्रत्येक घराशी संबंधित आहे… Agree वाटत असेल तर share करा आणि चर्चा सुरू होऊ द्या.