Just For Hearts

Diabetes

ग्लुकोमीटरवरील साखर आणि लॅब रिपोर्टमधला फरक का?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"ग्लुकोमीटरवर साखर 140 दाखवत आहे, पण लॅब रिपोर्टमध्ये 170? कोणता खरं आहे?"

काही चुकत आहे का? या फरकाचे काही कारणे आहेत:

1. वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड सॅम्पल: ग्लुकोमीटर capillary blood वापरतो (बोटाच्या टोकावरून), तर लॅब venous blood (शिरेतून) वापरते.

2. साखर मोजण्याचा वेळ थोडासा बदलल्यास फरक पडू शकतो.

3. हात न धुतल्यास ग्लुकोमीटरची रीडिंग चुकीची येऊ शकते.

4. लॅबमध्ये मोजणी अधिक अचूक असते. ग्लुकोमीटरमध्ये +/- 10-15% चा फरक येऊ शकतो, जो मान्य आहे.

5. हा फरक सर्वांमध्ये होतो, फक्त तुमच्यात नाही! हे सामान्य आहे आणि यामुळे काळजी करण्याची गरज नाही.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#sugar#diabetes#glucometer#blood-sugar#lab-report#health-tips
Share:WhatsAppXFacebook