Gut Health
तुमचा Gut आणि Gut feeling: वेळेवर इशारा देणारे संकेत
1. Gut म्हणजे केवळ पचन नाही; तो ‘दुसरा मेंदू’ आहे. तुमचं पोट रोज फक्त अन्न पचवत नाही, तर भावना, निर्णय, आणि ऊर्जा ह्यांचंही नियंत्रण करतं.
2. Gut feeling म्हणजे मेंदू नव्हे, ‘मनातून’ आलेली सगळी जाणीव. “कळत नव्हतं, पण असं वाटलं…” – ही भावना तुमचं पोट तुम्हाला सांगतं असतं.
3. पोट बिघडलं की मन बेचैन होतं; मन अस्थिर झालं की पचन थांबतं. तणाव, गोंधळ, अपमान… ही मनाची दुःखं पोटात साठतात – आणि मग सुरुवात होते गॅस, फुगणं, थकवा यांची.
4. मी अनेक रुग्ण पाहिले – जे फक्त गोळ्या घेत राहिले, पण मनावर काम केलं नाही. तेव्हा जाणवलं: शरीर आणि मन यांचं नातं उलगडलं की, उपचार लवकर लागतात.
5. Gut आणि Feelings – दोन्ही चे वेळेवर ऐकणं हाच खराखुरा प्रिव्हेंशन प्लॅन आहे. “Gut feelings ही काही जादू नाही, ती तुमच्या शरीराची साद असते… तिच्याकडे दुर्लक्ष केलं, तर पुढचा त्रास नक्की.”