Gut Health
Gut Inflammation: कारणे, Symptoms आणि Management
तुम्हाला वारंवार Acidity, पोट फुगणं, Constipation होत असेल…आणि Energy, Mood, Focus पण बदलत असेल… तर ही फक्त Digestion ची समस्या नसते तर Gut Inflammation असू शकते.
1. Inflammation नेमका का होतो?
वारंवार चुकीचं खाणं, Stress, औषधांचा जास्त वापर यामुळे Gut चं Protective Layer (Gut Lining) कमजोर होतं, Unwanted पदार्थ आत जातात. शरीरात Inflammation सुरू होतो.
2. सुरुवात Symptoms ओळखण्यापासून:
- पोट फुगणं - Acidity / जळजळ - Loose Motions / Constipation - जेवल्यावर जडपणा
हे वारंवार होत असेल तर ते “Normal” नाही.
3. Gut Flora (आतील जिवाणू संतुलन)
पोटात चांगले Bacteria असतात. ते Digestion, Immunity आणि Bowel Pattern सांभाळतात. त्यांचा Balance बिघडला की Inflammation वाढतो.
4. Antibiotics आणि Acidity च्या औषधांचा परिणाम
वारंवार Antibiotics आणि Acidity साठी PPI औषधं (Pantoprazole सारखी): - Gut Bacteria कमी करतात. - Digestion कमजोर करतात. म्हणूनच गरज असेल तेव्हाच वापर करा.
5. जेवणाची पद्धत (Meal Pattern)
सतत काहीतरी खात राहणं Gut ला Rest देत नाही. ठराविक वेळेत जेवण Gut ला Repair करण्याची संधी देतं.
6. Processed vs. Natural Food
Chips, Biscuits, Bakery Items, Packaged Food, Sugary Drinks Inflammation वाढवतात.
भाज्या, फळं, डाळी, ज्वारी, बाजरी, Oats Gut Bacteria साठी चांगलं Fuel आहेत.
7. Fiber आणि पाणी
Fiber (भाजी, Salad, फळं, डाळी) Bowel Movement सुधारतो. पण हळूहळू वाढवा आणि पाणी पुरेसं घ्या.
8. Stress आणि Sleep - Gut-Brain Link
Gut आणि Brain हे Nerves आणि Chemicals (Serotonin) ने जोडलेले असतात.
Stress वाढला की Gut Disturb होतो. झोप कमी असली की Repair होत नाही.
9. कधी Serious घ्यायचं?
तुम्हाला खालील गोष्टी जाणवत असतील तर: - वजन कमी होणं - Stool मध्ये Blood - Persistent त्रास
Evaluation आवश्यक आहे.
10. Assessment कसं करायचं?
सुरुवातीला Symptoms, Bowel Pattern, Food Response Track करा.
Specific Cases मध्ये: - Stool Calprotectin (आतील Inflammation मोजण्यासाठी) - CBC, CRP (Body Inflammation)
हा Test सर्वांना करायचा नसतो, Persistent Symptoms असतील तरच Useful आहे.
11. सुधारणा कशी ओळखाल?
- 1–2 आठवडे → फुगणं कमी - 3–4 आठवडे → Digestion सुधारतो - 6 आठवडे → Pattern Stable Consistency महत्त्वाची आहे.
Gut Inflammation हा फक्त पोटाचा प्रश्न नाही… तो Mood, Energy आणि Metabolism वर परिणाम करतो.
हे बदल Prevention आणि Treatment दोन्हीसाठी महत्त्वाचे आहेत.
तुम्हाला खालीलपैकी काय जास्त जाणवतं? - पोट फुगणं - Acidity - Constipation / Irregular Bowel Movements - Mood / Focus बदल
हे समजून घेणं ही पहिली पायरी आहे. आता पुढची पायरी: Tracking सुरू करा.
Just For Hearts वर Basic Vitals Tracking आणि Self-Assessment Surveys Free आहेत. Awareness ते Action इथेच सुरुवात होते.