Just For Hearts

Heart Health

2D Echo करताना पायांच्या अंगठ्यावरचे केस कमी होणे: रक्तपुरवठ्याचा संकेत

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आज 2D Echo करताना रुग्णाच्या पायांकडे लक्ष गेले.

पायाच्या अंगठ्यावरचे केस कमी झालेले आणि त्वचेवर subtle बदल दिसत होते.

Cardiology मध्ये हा एक महत्त्वाचा clinical sign मानला जातो कारण अशा बदलांमुळे peripheral circulation (पायातील रक्तपुरवठा) कमी असल्याची शक्यता सूचित होऊ शकते.

Atherosclerosis (रक्तवाहिन्यांमध्ये चरबी/कॅल्शियम साचून narrowing होणं) ही फक्त हृदयापुरती मर्यादित नसते.

ती पायातील रक्तवाहिन्यांवरही परिणाम करू शकते आणि म्हणून काही रुग्णांमध्ये - toe hair loss - skin discoloration - पाय थंड पडणे - चालताना पाय दुखणे

असे subtle signs दिसू शकतात, तसेच underlying coronary artery disease (हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील disease) चा risk जास्त असू शकतो.

⚠️ महत्त्वाचं म्हणजे हे signs दिसले म्हणजे heart disease आहेच असा निष्कर्ष नाही आणि panic होण्याचीही गरज नाही.

पण अशा signs कडे दुर्लक्ष न करता risk factors, circulation आणि heart health वेळेत assess करणं महत्त्वाचं ठरतं.

कधी कधी शरीर छोटे संकेत आधी देतं, reports नंतर येतात.

Hair loss over toes can be a subtle clue to poor circulation. Atherosclerosis affects both leg and heart arteries. अशा लहान संकेतांनी proactive heart health evaluation करणे आवश्यक आहे.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#clinical-signs#peripheral-artery-disease#atherosclerosis#heart-health#cardiology
Share:WhatsAppXFacebook