Blood Pressure
BP अचानक वाढल्यावर घाबरायचं का? नाही!
BP अचानक वाढल्यावर घाबरायचं का? नाही! हे वाचा आणि लगेच शेअर करा.
रुग्ण विचारतात: "सर, घरच्या मशीनवर अचानक BP 160-170 दाखवतंय! आता काय करू?"
माझ्या मते, अचानक वाढलेलं BP = हे panic reading असू शकतं. अशावेळी घाईने औषध वाढवणं किंवा हॉस्पिटलला धावणं टाळता येतं, जर तुम्ही खालील उपाय केलेत तर.
BP वाढल्यावर काय करावं? 1. खोल श्वास घेऊन 5-10 मिनिटं शांत बसणं: वैज्ञानिक संशोधन (JAMA, 2001) दर्शवतं की deep breathing मुळे sympathetic overdrive कमी होतो आणि BP मध्यम प्रमाणात खाली येतो.
2. फोन, टीव्ही, बातम्या टाळा: Visual आणि emotional overstimulation मुळे BP spikes होतो (source: Hypertension Journal, 2020).
3. थोडं कोमट, कमी मीठाचं काहीतरी प्या: जसं कोमट पाणी, fat-free हळदीचं दूध किंवा धणे उकळून केलेलं पाणी (धण्याचा काढा). यामुळे शरीर शांत होतं, मन स्थिर राहतं आणि तणावामुळे वाढलेला BP थोडा कमी होतो.
4. 15 मिनिटांनी BP पुन्हा मोजा: दोन्ही हातावर आणि योग्य पद्धतीने. BP 10–20 mmHg नी कमी दिसू शकतो (Reference: AHA Guidelines, 2017).
5. आज जेवणात मिठाचं प्रमाण कमी करा. एका दिवसात sodium reduction मुळेही BP सुधारतो (source: DASH Diet Trials).
महत्त्वाचं समजून घ्या: • घरच्या मशीनवर BP वाढलेलं दिसणं = नेहमीच actual emergency नसतं. • Stress, full bladder, कमी झोप, caffeine, मोजण्याची चूक यामुळे BP चुकून वाढतो.
Disclaimer: वरील सर्व सल्ला हा “panic BP reading” च्या context मध्ये आहे. तुम्ही नियमित औषध घेत असाल, तर ते बंद करू नका. BP वारंवार जास्त दिसत असेल, तर तपासणी करून वैद्यकीय सल्ला घ्या. हा सल्ला फक्त ‘तीव्र घाबराट’ टाळण्यासाठी आहे, ‘औषध पर्याय’ नाही.
हे वाचून 1 माणसाचं मन स्थिर झालं तरी उपयोग झाला म्हणावा. म्हणूनच हा पोस्ट WhatsApp वर शेअर करा.
हृदयाची काळजी घेणं म्हणजे अचानक hospital धावणं नाही, तर अशा प्रसंगी ‘काळजीपूर्वक’ वागणं.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts