Mental Wellness
नातेसंबंधांसाठीही Health Checkup आवश्यक आहे
आपण आपल्या आरोग्यासाठी काय करतो? • नियमित तपासण्या करतो • आहार, व्यायाम, जीवनशैली सुधारतो • लहानशी तक्रार जरी आली तरी लगेच उपाययोजना करतो
हे का? कारण आपल्याला माहित आहे – मानवी मृत्यू वेदनादायी असतो.
पण नातेसंबंधांचं काय? हे फक्त प्रेमसंबंध किंवा ब्रेक-अपपुरतं मर्यादित नाही. पालक–मुलं, भावंडं, मित्रमैत्रिणी, सहकारी – अशा प्रत्येक नात्यात कधी ना कधी misunderstanding, अंतर, राग, मौन येतंच.
कधी संवाद तुटतो, कधी विश्वास कमी होतो, आणि हळूहळू नातं जिवंत असलं तरी “मृत” होतं.
Relationship death हेही माणसाच्या मृत्यूसारखंच वेदनादायी असतं. फरक इतकाच, या जखमेवर plaster लावत नाही… ती आतल्या आत ठसठसत राहते.
काय करायला हवं? • नियमित संवाद तपासणी: बोलणं कमी झालंय का? गैरसमज तयार होतायत का? • प्रेम आणि कृतज्ञता तपासणी: कौतुक, धन्यवाद, आधार – शेवटचं कधी दिलं? • राग व अहंकार हे risk factors: वेळेत सुधारले नाहीत तर नातं तुटतं.
ही पोस्ट फक्त ब्रेकअप्ससाठी नाही. ही पोस्ट प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक नातेसंबंधासाठी आहे. समस्या ओळखा, योग्य वेळी कृती करा, छोट्या पावलांनीही नातं वाचवा. कारण – “मानवी मृत्यू वेदनादायी असतो, पण नातेसंबंधांचा मृत्यू तितकाच असह्य असतो.”
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts