Just For Hearts

Lifestyle

Health Tracking : भविष्यातील वैद्यकीय काळजी जी आजपासून शक्य आहे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Health Tracking म्हणजे भविष्यातील वैद्यकीय काळजी आहे, जी आजपासूनच शक्य आहे!

२५ वर्षांत लाखो रुग्ण तपासले आणि हजारो आजार पाहिले. एक गोष्ट लक्षात आली की, जे लोक स्वतःचं आरोग्य ट्रॅक करतात, ते आजाराचं मूळ टाळू शकतात.

अधिकांश lifestyle diseases symptoms शिवाय सुरू होतात आणि लपून राहतात, जोपर्यंत उशीर होत नाही.

Health Tracking म्हणजे आपल्या शरीरात रोज होणाऱ्या बदलांची नोंद ठेवणं. यामुळे निदानाआधीच इशारा मिळतो आणि कृती करता येते.

या ३ गोष्टींपासून सुरुवात करा:

१. Blood Pressure (BP): High BP ची सुरुवात symptoms शिवाय होते. वेळेवर लक्ष दिलं नाही तर हृदयविकार, किडनी डॅमेज, आणि स्ट्रोकचा धोका ४ पट वाढतो.

२. Blood Sugar: Type 2 Diabetes पूर्वीच Insulin Resistance सुरू होते. दर महिन्याला एकदा Fasting आणि PP ची तपासणी करणे हा Reversal साठी पहिला टप्पा आहे.

३. Body Weight: वाढतं वजन म्हणजे फक्त Fat नाही, तर Metabolic Syndrome, PCOD, Fatty Liver आणि Heart Disease यांचं दार उघडतं.

"मी आजारी नाही" ही समज चुकीची ठरू शकते. - Pre-hypertension आणि Pre-diabetes diagnostic test मध्ये अनेकांना आढळते. - पण योग्य वेळी tracking केल्यास ही स्थिती reversible आहे. - बऱ्याचदा रुग्ण म्हणतात, "डॉक्टर, काहीच त्रास नव्हता," पण निदान तेव्हा होतं जेव्हा बरेच नुकसान आधीच झालेलं असतं.

ट्रॅकिंग करणं सोपं आहे: - प्रत्येक घरात BP Monitor, Glucometer, आणि Weighing Scale असायला हवेत. - आठवड्यातून २ वेळा BP आणि वजन मोजा, महिन्यातून एकदा शुगर मोजा. - WhatsApp Note, डायरी, Google Sheet कुठेही लिहा, पण नोंद ठेवा.

आजच सुरुवात करा. लवकरच तुमचं ट्रॅकिंग अधिक सोपं होईल, पण तोपर्यंत ही सवय लावा.

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#health-tracking#lifestyle-diseases#blood-pressure#diabetes#obesity#heart-health
Share:WhatsAppXFacebook