Lifestyle
तुमच्या सकाळच्या सवयी कशा आहेत?
तुमच्या सकाळच्या सवयी कशा आहेत?
गेल्या काही पोस्टमध्ये आपण सकाळच्या आरोग्यवर्धक सवयींवर चर्चा केली आहे. आज एक झटपट आणि समृद्ध सारांश:
1. लवकर उठणे आणि काही मिनिटांत ऊर्जादायी सुरूवात सकाळी 5 ते 6 या वेळेत उठणे मेंदू व शरीरासाठी फायदेशीर आहे. शांतता, नैसर्गिक प्रकाश आणि स्वतःसाठी वेळ मिळतो.
2. दात घासल्यावर थंड पाणी पिणे रात्री तोंडात जमा झालेले विषारी घटक दूर होतात आणि पचन सुधारते.
3. स्ट्रेचिंग: किमान 15 मिनिटे स्नायूंमध्ये लवचिकता येते, व्यायामासाठी तयार करतो आणि शरीर जागं होतं.
4. रक्तदाब / साखरेची तपासणी (जर आवश्यक असेल तर) हृदयरुग्ण, मधुमेही आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळची तपासणी महत्त्वाची आहे.
5. रिकाम्या पोटी औषधं घेणं विसरू नका थायरॉईड, BP, साखरेची औषधं वेळेवर घेणं आवश्यक आहे.
6. सकाळचा व्यायाम (30 मिनिटे) चालणं, प्राणायाम, सूर्यनमस्कार वय, प्रकृती आणि सवडीप्रमाणे निवडा.
7. सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा Vitamin D, मूड सुधारणा आणि नॅचरल बॉडी क्लॉकसाठी उपयुक्त.
8. जर्नल लिहा, 5 मिनिटे धन्यवाद / gratitude भावना आणि दिवसाची उद्दिष्टं लिहा. मानसिक स्वच्छता होते.
9. रोज पूजा किंवा मनोभावे प्रार्थना करा मनःशांती, एकाग्रता आणि आध्यात्मिक जोड मिळते.
10. घरकामात सहभागी व्हा (NEAT वाढवण्यासाठी) बिछाना घालणं, भांडी ठेवणं, हलकं झाडून घेणं सहज चैतन्य वाढवतं.
11. एक आरोग्यदायी निर्णय घ्या “आज मी साखर टाळणार”, “आज मी राग व्यक्त करणार नाही” अशी साधी प्रतिज्ञा बदल घडवू शकते.
रात्रीच्या ड्युटी किंवा नाईट शिफ्टमुळे सकाळी उठणं शक्य नसेल तर? तुमचं शरीर शिफ्ट वेळेप्रमाणे रचलेलं असतं. फक्त सवयी एकसंध ठेवा आणि शिफ्ट नंतरचे 2 तास तुमचं ‘सकाळचं वेळापत्रक’ मानून सुरूवात करा.
तुम्ही या यादीतून कोणती सवय आधीपासून पाळता? कोणती नवीन सुरुवात आजपासून करणार? कृपया कॉमेंटमध्ये लिहा आणि हा संदेश आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts