Just For Hearts

Heart Health

हृदयाचं नुकसान एका सवयीमुळे होत नाही…

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

हृदयाचं नुकसान एका सवयीमुळे होत नाही… पण ते एका योग्य सवयीमुळे टाळता येऊ शकतं.

आजपासून सुरू करू शकणाऱ्या 10 heart-saving सवयी:

1. Morning BP → तुमचं ‘Real BP’ सकाळचा Blood Pressure हा दिवसभरातील खरा indicator आहे. Morning surge वाढलेला असेल तर Heart Attack चा धोका दुप्पट होतो. दोन रीडिंग पुरेशा आहेत मोठा धोका टाळण्यासाठी.

2. नियमित 12-Hour Overnight Fasting → Heart’s Rest Time दररोज 12 तास fasting केल्याने insulin sensitivity आणि arterial stiffness दोन्ही सुधारतात. शरीराला रात्री rest मिळाल्यावर हृदय हलकं काम करतं.

3. रोज 3-Minute “Sugar Sink” Walk (जेवणानंतर) जेवणानंतर 2–3 मिनिटं सरळ चालल्याने glucose spikes 25–30% कमी होतात. हृदयासाठी ही एक अत्यंत underrated पण शक्तिशाली micro-habit आहे.

4. “Stair First” Habit एक-दोन मजले lift न वापरता पायऱ्या चढा. Weekly oxygen capacity subtleरीत्या वाढते आणि हृदय मजबूत होते. Busy schedule असला तरी या 30 सेकंदांना पर्याय नाही.

5. Smart Salt Switch मीठ 1 gm कमी केल्याने Blood Pressure 4 units कमी होतो. Hidden salt: pickles, papad, chips, restaurant gravies मध्ये असतो. घरचं मसाला-मिश्रण = सर्वोत्तम heart protection.

6. दररोज 4 PM “Cortisol Reset” दुपारनंतर Blood Pressure आणि Heart Rate वाढतात. 4 pm ला 2 मिनिटं breathing केल्याने HRV सुधारते आणि हृदय शांत होते. Stress control साठी ही सर्वात practical वेळ आहे.

7. व्यवस्थित नीट चावून जेवण करणे. 30 Chews → Controlled Sugar + Controlled Appetite अन्न 30 वेळा नीट चावल्याने post-meal sugar 10–20% कमी होतो आणि eating pace सुधारतो. हृदयासाठी mindful eating = medication जितकंच उपयोगी.

8. Screen-Off 40 Minutes Before Bed रात्रीचे stress hormones कमी केल्यास morning Blood Pressure 5–7 mmHg कमी होतो. Night Blood Pressure हा silent killer आहे. स्क्रीन कमी केल्याने हृदय सुरक्षित राहतो.

9. Anti Inflammatory Plate पालक, बीट, हळद, जवस, अक्रोड यांचा समावेश करा. हे arterial inflammation कमी करतात. हृदयासाठी आठवड्याचा एक छोटा ‘repair ritual’ आहे.

10. Monthly Heart Trend Check, Not Full Tests Reports नाही तर पॅटर्न पहा: • Waist size • Fasting sugar changes • Pulse recovery after climb • Breathlessness pattern Trend tracking = early warning system.

ही यादी का काम करते? कारण हृदयाचं रक्षण expensive treatments मध्ये नाही तर daily micro-habits मध्ये आहे ज्या तुम्ही आजपासून सुरू करू शकता.

आज एक सवय निवडा. उद्या हृदय वाचेल.

ही यादी तुमच्या parents, friends, family सोबत शेअर करा. एक सवय एक कुटुंबाचा भविष्य बदलू शकते.

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-health#heart-attack-prevention#healthy-habits#blood-pressure#stress-management#nutrition#fitness
Share:WhatsAppXFacebook