Just For Hearts

Heart Health

हार्ट आजार “कमी” काळजीमुळे नाही, तर “जास्त” गोंधळामुळे वाढतो

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

हार्ट आजार “कमी” काळजीमुळे नाही, तर “जास्त” गोंधळामुळे वाढतो.

बहुतेक हार्ट पेशंट्स आजारी पडतात कारण ते चुकीचं करत नाहीत, तर अनावश्यक गोष्टी खूप जास्त करतात.

जास्त विचार. जास्त मतं. जास्त ताण. जास्त expectation.

आणि हृदयाला शांतता मिळत नाही.

मी रोज पाहतो असे सर्वात common अशा patient behaviours:

1. काही दिवस पूर्ण inactivity, मग अचानक जोरदार exercise. हार्टला नियमित rhythm हवा असतो, अचानक shock नको. Minimalism = रोज थोडी, सातत्यपूर्ण हालचाल.

2. एका साध्या निर्णयासाठी 8–10 लोकांचे opinions, confusion वाढतो, treatment उशिरा सुरू होतं. Minimalism = 1 treating doctor + 1 second opinion. पुरेसं.

3. Reports, YouTube, WhatsApp वरून स्वतः diagnosis. भीती वाढते, चुकीचे निष्कर्ष निघतात. Minimalism = 3 प्रश्न, 3 स्पष्ट उत्तरं, एक plan.

4. जेवण, वेळा, झोप - काहीच ठरलेलं नाही, Sugar BP सतत वरखाली. Minimalism = ठरलेली routine = metabolic stability.

5. दिवसभर बसून राहणं, रात्री guilt exercise, झोप बिघडते, BP वाढतो. Minimalism = जेवणानंतर 10–15 मिनिटांची चाल.

6. लहान गोष्टींवर कारण नसताना राग/चिडचिड, Stress hormones थेट heart वर परिणाम करतात. Minimalism = प्रतिक्रिया देण्याआधी 5 श्वास.

7. झोपेची तडजोड, सतत screen, Morning BP surge वाढतो. Minimalism = झोपेआधी 40 मिनिटं screen-off.

8. औषधं “आज बरं वाटतंय” म्हणून skip, Risk silent पण घातक. Minimalism = fixed time + pill box + simple tracker.

9. सगळं perfect करायच्या नादात सुरुवातच नाही, Over planning = paralysis. Minimalism = आज एकच सवय सुरू करा.

Minimalism हृदयासाठी इतकं प्रभावी का आहे? कारण ते decision fatigue कमी करतं, stress hormones शांत करतं, आणि body ला predictability देतं जे हृदयाला सर्वात जास्त हवं असतं.

Heart disease manage किंवा prevent करायला: 10 नवीन गोष्टी add करायच्या नसतात, 10 अनावश्यक गोष्टी काढायच्या असतात.

मी स्वतः गेल्या काही वर्षांत lifestyle आणि decision-making वरची अनेक पुस्तकं वाचतो आहे. त्यातली एक संकल्पना: “Less, but better” मी आज अनेक हार्ट पेशंट्सना सहज लागू करून देतो आणि परिणाम प्रत्यक्ष दिसतात.

(कधी कधी साधेपणाच सगळ्यात advanced treatment असतो.)

आज स्वतःला एक प्रश्न विचारा: आजपासून मी कोणती एक अनावश्यक गोष्ट कमी करू शकतो - opinions, overthinking, screen, राग, किंवा guilt?

कमेंटमध्ये लिहा. हा पोस्ट share करा विशेषतः BP, diabetes, heart-risk असलेल्या लोकांसाठी. साधेपणा कधी कधी जीव वाचवतो.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-health#minimalism#stress-reduction#lifestyle#blood-pressure#diabetes#heart-risk
Share:WhatsAppXFacebook