Just For Hearts

Heart Health

Triglycerides (TG) कमी होण्यासाठी किती दिवस लागतात?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

आजकाल OPD मध्ये एक सामान्य प्रश्न आहे: "सर, माझे Triglycerides (TG) 375 आहे… ते किती दिवसात कमी होईल?"

Triglycerides म्हणजे काय समजून घेऊया: TG म्हणजे रक्तात साठलेली excess energy (fat). जास्त TG म्हणजे metabolic risk वाढणे, ज्याचा परिणाम हृदय, लिव्हर आणि pancreas वर होतो.

जास्त TG असल्याचा अर्थ शरीर नीट glucose आणि fat हाताळत नाही.

TG वाढण्याची कारणे: - साखर, sweet drinks, bakery पदार्थ - refined carbs (पांढरा भात, bread) - alcohol (मुख्य culprit) - पोटावरील चरबी - uncontrolled diabetes - कमी हालचाल, उशिरा जेवण

TG वाढल्याचे धोके: - Heart disease / attack चा धोका वाढतो - Fatty liver - TG ≥500 असल्यास Pancreatitis चा धोका

TG किती दिवसात कमी होतात? - 2–3 आठवडे: lifestyle change चा परिणाम सुरू होतो - 6–8 आठवडे: स्पष्ट घट दिसते - 12 आठवडे: stable improvement

TG हे lifestyle ला सगळ्यात लवकर respond करणारे lipid आहेत.

TG कमी करण्यासाठी प्रभावी उपाय: - Added sugar पूर्ण बंद करा - Alcohol टाळा - वजन 5–7% कमी केल्यास TG मध्ये 20–30% घट होते - रोज 30–40 मिनिटं brisk walk, cycle किंवा swimming करा - जेवणानंतर 10–15 मिनिटं चालणे - Late-night snacking टाळा - Fiber आणि omega-3 युक्त आहार, Nuts, पालेभाज्या, जवस यांचा समावेश करा

औषधं कधी लागतात? - TG >400–500 - Diabetes किंवा heart disease असल्यास - Lifestyle करूनही TG कमी होत नसल्यास

औषधांचा निर्णय doctor urgency आणि risk पाहून घेतात.

औषधांचा परिणाम कधी दिसतो? - 7–10 दिवसांत सुरुवात - 4–6 आठवड्यांत सुधारणा दिसते (Consistency खूप महत्त्वाची आहे)

२५ वर्षांचा clinical अनुभव सांगतो की: TG कमी करणे म्हणजे एक test नाही तर system बदलणे आहे. Numbers बदलतात, पण metabolism तेव्हाच सुधारतो जेव्हा सवयी रोज योग्य दिशेने जातात. Chronic care मध्ये औषधांपेक्षा जास्त सातत्य, tracking आणि expert मार्गदर्शन आवश्यक आहे.

Tracking + lifestyle + timely decisions = long-term control.

तुमचे TG जास्त आहेत का? तुमचा number comment मध्ये लिहा, चर्चा करूया.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#triglycerides#heart-health#metabolic-health#lifestyle#fatty-liver#diabetes#cardiology
Share:WhatsAppXFacebook