Just For Hearts

Fitness

रोज किती सूर्यनमस्कार करावे?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

रोज किती सूर्यनमस्कार करावे?

कोणी म्हणतात 12, कोणी म्हणतात 108… पण वैद्यकीय दृष्टिकोनातून यामागचं गणित काय?

1. सुरुवात ही “फॉर्म” आणि “श्वसनतंत्र” समजून घेऊनच करा रोज फक्त 3-5 सूर्यनमस्कारही पुरेसे असतात जर तुम्ही योग्य पद्धतीने, Breath Coordination ठेवून केले तर. “गतीपेक्षा स्थिरता आणि शुद्धता जास्त परिणामकारक ठरते.”

2. श्वास समन्वय म्हणजे काय? प्रत्येक आसनामध्ये श्वास घेणे वा सोडणे एक विशिष्ट लयीत, उदा. ‘भुजंगासन’ करताना श्वास आत, ‘पश्चिमोत्तानासन’ करताना श्वास बाहेर. यामुळे parasympathetic nervous system सक्रीय होतं → मानसिक शांती, Blood Pressure नियंत्रण, आणि Insulin Sensitivity सुधारते. (Ref: J Yoga Phys Ther, 2022)

3. दररोज १२ सूर्यनमस्कार हे एक ‘वैद्यकीयदृष्ट्या पुरेसं’ प्रमाण मानलं जातं 12 सूर्यनमस्कार = 288 हालचाली → यामुळे metabolism तेज होतो, fat oxidation वाढते, आणि साखर नियंत्रणास मदत होते.

4. व्यायामाच्या स्वरूपात हे “Low-Impact Dynamic Meditation” आहे हृदयासाठी अत्यंत सुरक्षित, स्नायू-हाडं मजबूत करणारा आणि stress hormones कमी करणारा व्यायाम. (Ref: IJMR, 2020 : Yoga vs Aerobic comparison)

5. शरीरासोबत संवाद साधा, दम लागतोय? गुडघे दुखतात? कमी करा, थांबा, पर्याय निवडा. व्यायाम म्हणजे शिक्षा नाही, समजूतदार संवाद आहे.

6. सूर्यनमस्कार शक्य नसेल तर नियमित चालणं, प्राणायाम, योगासनं हेही उत्तम पर्याय ठरतात.

7. उपवासाच्या दिवशी सूर्यनमस्कार करताना विशेष खबरदारी ठेवा. ऊर्जा कमी असते, त्यामुळे फार exertion टाळा. प्राणायाम, स्ट्रेचिंग वा सौम्य हालचाल निवडा.

8. हृदयविकार, उच्च Blood Pressure, ऑर्थरायटीस यांसाठी वैद्यकीय मार्गदर्शन आवश्यक. सकाळी उपाशीपोटी / भिजलेल्या चटईवर / गरम हवामानात सराव करताना सावधगिरी बाळगा.

9. डाएटिंगपेक्षा मी उपवास व सूर्यनमस्कार याला जास्त प्रभावी मानतो, क्लिनिकमध्येही याचा अनुभव घेतलाय. हा शरीर-मन संवादाचा सुलभ मार्ग आहे.

10. “संपूर्ण नाही जमलं तरी सुरूवात ही आरोग्याकडे एक पाऊल असतं.” ❤️

“सूर्यनमस्कार हा अध्यात्म, व्यायाम आणि वैज्ञानिक शिस्त यांचा संगम आहे, ती भावना समजून घेऊनच करावा.”

Follow करा, सुरुवात करा, आणि तुमचा अनुभव शेअर करा!

Dr. Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI (Cardiology) Just For Hearts

#surya-namaskar#heart-health#yoga#breath-coordination#fitness#stress-relief#insulin-sensitivity
Share:WhatsAppXFacebook