Just For Hearts

Gut Health

सगळ्या टेस्ट नॉर्मल असतानाही पोट का बिघडतं?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"सगळ्या टेस्ट नॉर्मल असतानाही पोट का बिघडतं?" हे IBS मुळे असू शकतं, एक फारच गोंधळात टाकणारं पण सामान्य आजार.

1. IBS म्हणजे नक्की काय? पोटफुगी, झरझर सैल मल, कधी बद्धकोष्ठता, गॅस, खवखव हे सारं आलटून पालटून. कुठल्याही टेस्टमध्ये काही सापडत नाही म्हणून बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं.

2. काही खाल्लं की पोट दुखतं पण नक्की काय टाळायचं, हे समजत नाही! Trigger food व्यक्तीगणिक वेगळे; काहींना दूध, काहींना बेकरी, काहींना सोयाबीन! Low FODMAP diet म्हणजे असे पदार्थ टाळणं जे लहान आतड्यात नीट पचत नाहीत, त्यामुळे फुगवटा, गॅस होतो. सुरुवातीला थोडा कठीण वाटतो, पण अनुभवाने हे triggers ओळखणे सोपे होते.

3. Stress, Anxiety, आणि IBS हे एकाच त्रिकोणाचे कोन आहेत. ताणतणाव पचनसंस्थेवर थेट परिणाम करतो; gut-brain axis फार महत्त्वाचा आहे. तुम्ही शांत तर पोट शांत!

4. Test नॉर्मल आल्या तरी काही खास तपासण्या उपयोगी आहेत: • Stool test: सूज किंवा संसर्ग आहे का ते बघा • Colonoscopy (वय >40 असताना) • Food intolerance / microbiome testing ह्या advance tests पण फायदेशीर आहेत

5. थेट इलाज नाही, पण दीर्घकालीन नियंत्रण सहज शक्य आहे: • Soluble fiber, probiotics, आणि काही वेळेस meds • Personalized plan → triggers ओळखणं आणि टाळणं • Lifestyle, sleep, आणि mental health वर काम करणं अत्यावश्यक आहे

6. IBS = अज्ञात नाही, अडथळा नाही. एक “समजून घ्या आणि सोबत न्या” असा मित्र आहे! तुमच्या शरीराशी मैत्री करा, पोट तुमचं ऐकेल!

"IBS cured" असं कुठेही वाचलंत, तर सावध व्हा!

Positive change is possible, हजारो रुग्णांनी केलं आहे, तुम्हीही करू शकता!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#ibs#gut-health#stress#digestion#low-fodmap#probiotics#mental-health
Share:WhatsAppXFacebook