Just For Hearts

Lifestyle

ICU Patients चे नातेवाईक: Panic की Preparedness?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

ICU Patients चे नातेवाईक जवळजवळ सारखेच दिसतात: डोळ्यात भीती, हातात फोन, आणि मनात एकच प्रश्न – “Doctor, आता काय होईल?”

ICU मधली panic एका दिवसात तयार होत नाही. ती अनेक वर्षांच्या टाळलेल्या सवयी, पुढे ढकललेले निर्णय आणि दुर्लक्षित संकेतांची एकत्रित प्रतिक्रिया असते.

1. Panic अचानक दिसतो, पण तयारी वर्षानुवर्षं पुढे ढकललेली असते. घटना अचानक वाटते, पण तिची कारणं आधीपासून तयार होत असतात.

2. “Doctor, काहीही करा” हे वाक्य ICU मध्ये खूप वेळा ऐकतो, पण शरीराला वर्षानुवर्षं आधी मदत हवी असते.

3. Preparedness वेगळी असते. तयारी म्हणजे: - regular follow-up - औषधं नियमित घेणं - lifestyle गंभीरपणे घेणं - emergency numbers माहित असणं

ही panic ची नाही, discipline ची सवय आहे.

4. Financial planning असतं, पण health planning नसतं. Insurance policy असते, पण preventive evaluation नसतं. आपण पैसा सुरक्षित ठेवतो, पण शरीराची योजना करत नाही.

5. Caregiver अचानक तयार होतो. ICU मध्ये कुटुंबातील एक व्यक्ती caregiver बनतो, पण त्या व्यक्तीला health journey मध्ये आधी विश्वासात घेतलं होतं का?

6. भीती टाळता येत नाही, पण तयारी करता येते. Preparedness म्हणजे भीती कमी करण्याचा शहाणपणाचा मार्ग.

7. Metabolic diseases वेळ देतात. बहुतेक metabolic आजार अचानक येत नाहीत. ते आधी संकेत देतात: - BP वाढतं - sugar बदलतो - weight वाढतो - थकवा वाढतो

पण आपण म्हणतो “नंतर बघू.”

8. Preparedness (शांत आणि स्थिर मनाने सामना) म्हणजे: - yearly health evaluation - reports समजून घेणं - lifestyle बद्दल घरात चर्चा - health वर collective निर्णय

9. Panic (गोंधळ आणि घाई) ऊर्जा वाया घालवतो. Preparedness (शांत आणि स्थिर मनाने सामना) ऊर्जा वाचवते.

10. विचार करा: काम, deadlines, meetings मध्ये आरोग्याची काळजी आपण किती घेतो?

⏳ नंतर बघू 😅 कधी कधी थोडी घेतो 💪 आता serious आहे

Panic (गोंधळ आणि घाई) कमी करण्याचा एकच मार्ग आहे - तयारी.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#icu#panic#preparedness#health-planning#metabolic-diseases#caregiver#lifestyle#preventive-health
Share:WhatsAppXFacebook