Just For Hearts

Lifestyle

तुमचं जेवण उरकण्यासाठी योग्य वेळ: 20 ते 30+ मिनिटे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

तुम्हाला कधी विचार केला आहे का की जेवण उरकण्यासाठी किती वेळ लागतो?

किमान वेळ 20 मिनिटे आहे, पण आदर्श वेळ 30 मिनिटे किंवा त्याहून अधिक असावी.

✅ 20 मिनिटे ही किमान गरज आहे. ✅ 30 मिनिटे किंवा अधिक वेळ आरोग्य, पचन आणि मानसिक शांततेसाठी उत्तम आहे.

जेवण म्हणजे एक mindful कृती असावी, घाईघाईची सवय नव्हे.

❌ Fast खाणं म्हणजे Feast नाही तर Future problems!

का?

1. सुमारे 20 मिनिटांनंतर मेंदू ‘पोट भरलं’ सिग्नल देतो. फार लवकर खाल्लं तर ओव्हरईटिंग होते. 2. सावकाश खाल्लं तर पचन सुधारतं, acidity आणि bloating टाळता येतात. 3. Diabetes रुग्णांमध्ये Sugar spikes कमी होतात, जे फार महत्त्वाचं आहे. 4. हृदय, लिव्हर, वजन नियंत्रण आणि मानसिक शांततेवर सकारात्मक परिणाम होतो. 5. “थोडं खाल्लं पण नीट पचवलं” हीच खरी Lifestyle मेडिसिन आहे!

Scientific Reference: • Harvard Health (2021): “Slow eating improves satiety and prevents overeating.” • Diabetes Care (ADA): “Fast eating linked to post-meal glucose spikes and obesity.”

आपल्या संस्कृतीत स्पष्ट सांगितलंय, सावकाश जेवा: “स-अवकाश जेवणं म्हणजे औषध.”

म्हणजे फक्त सावकाश नाही तर शिस्तीनं, शांतपणे, लक्षपूर्वक आणि कृतज्ञतेनं जेवण करावं.

“पोटभर जेवा” चांगलं वाटतं, पण हृदय, मेंदू, पचनासाठी “स-अवकाश जेवण” हेच उत्तम उत्तर आहे!

👉 फक्त Like करून थांबू नका… WhatsApp वर शेअर करा आणि Repost करा! तुमचा एक Repost कुणाचं तरी आरोग्य सुधारू शकतो.

जेवण बदललं की जीवन बदलू शकतं आणि ही चांगली सवय पुढे पोहोचवणं हीच खरी मदत आहे!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#mindful-eating#slow-eating#digestion#diabetes#heart-health#healthy-habits
Share:WhatsAppXFacebook