Just For Hearts

Lifestyle

Metabolism सुधारायचा असेल तर Timing महत्त्वाचे

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Metabolism सुधारायचा असेल तर पुढचा नियम: Timing.

लोक मला विचारतात “सर, काय खाऊ?” मी आधी विचारतो “कधी खाता?”

कारण शरीराला अन्नाची चव समजण्याआधी त्याला वेळ समजते.

Metabolism हा फक्त calories वर चालत नाही. तो वेळेच्या signal वर regulate होतो.

Timing म्हणजे नेमकं काय? Timing म्हणजे घड्याळ बघून जेवण नाही. तो शरीराला दिलेला संदेश आहे: आता खा., आता थांबा. आता साठवा., आता वापरा.

जर हा संदेश रोज बदलला तर hormones गोंधळतात.

Timing चुकली की काय होतं?

1. अनियमित जेवण = अनियमित insulin

प्रत्येक वेळी खाल्लं की insulin वाढतो. जर खाण्याची वेळच स्थिर नसेल तर insulin pattern विस्कळीत होतो.

2. सतत काहीतरी खाणं recovery ला अडथळा

Frequent eating सगळ्यांसाठी योग्य नसतं. विशेषतः insulin resistance, fatty liver, prediabetes मध्ये insulin खाली येण्यासाठी वेळ मिळणं आवश्यक असतं.

3. Meal gap म्हणजे शिक्षा नाही

जेवणांमध्ये 3–4 तासांचा structured gap शरीराला stored fuel वापरायला शिकवतो. यालाच metabolic flexibility म्हणतो.

4. Late dinner हा मोठा metabolic stress आहे

रात्री melatonin वाढलेली असते. त्या वेळी heavy meal glucose handling कमी कार्यक्षम करतं.

Late dinner हा under-estimated कारण आहे weight, sugar आणि fatty liver साठी.

5. Breakfast skip करायचं का?

सगळ्यांसाठी एकच नियम नाही. पण deranged metabolism असेल तर: * Early dinner * Overnight fasting window थोडी वाढवणं * सकाळचं जेवण जबरदस्ती न घेणं

भूक लागली तरच खा. Clock मुळे नाही.

Breakfast हा habit आहे, metabolic compulsion नाही.

6. Weekend timing बदलणं सुद्धा problem आहे

आठवड्यात एक वेळ आणि weekend ला दुसरी हा circadian mismatch आहे. Metabolism ला consistency आवडते.

7. Mindful Eating

ठरलेल्या वेळेला, बसून, शांतपणे खाल्लं तर satiety signals नीट काम करतात.

Timing म्हणजे फक्त “कधी” नाही, तो “कसा” सुद्धा आहे.

माझे मत:

Metabolism सुधारताना मी Diet च्या आधी विचारतो “तुमची वेळ स्थिर आहे का?”

Timing सुधारलं की quantity, cravings, overeating आपोआप सुधारतात.

Timing आधी. बाकी नंतर.

तुमची सर्वात मोठी चूक कोणती? Late dinner Frequent snacking Irregular meals

#metabolism#meal-timing#insulin-resistance#fatty-liver#weight-management#healthy-habits#lifestyle#mindful-eating
Share:WhatsAppXFacebook