Just For Hearts

Diabetes

"इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी": तुमच्या आरोग्याचं खरं मापदंड

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी": तुमच्या आरोग्याचं खरं मापदंड

इन्सुलिन हा हार्मोन आहे जो जेवणानंतर रक्तातील साखर पेशींमध्ये उर्जा म्हणून वापरायला मदत करतो.

जेव्हा तुमच्या पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देतात आणि साखर रक्तातून पटकन पेशींमध्ये जाते, तेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली असते.

इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणजे काय? - पेशी इन्सुलिनकडे दुर्लक्ष करतात. - रक्तातील साखर वाढते, इन्सुलिन अधिक स्रवतं, तरी साखर नियंत्रणात राहत नाही. - यामुळे prediabetes, टाइप 2 डायबेटिस, लठ्ठपणा, PCOS, आणि fatty liver ची शक्यता वाढते.

सध्या ही समस्या का वाढतेय? - भूक न लागता सतत खाणं (snacking without hunger) - प्रोसेस्ड फूड्स ज्यात साखर, मैदा, आणि तेलकट पदार्थ असतात - व्यायामाचा अभाव आणि बैठं जीवनशैली - कमी झोप आणि ताण - दिवस-रात्र भुकेचे संकेत मेंदूला गोंधळलेले असणे

इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी 8 सोपे उपाय: 1. रोज चालणं आणि strength training करा; स्नायूंना काम दिल्यास इन्सुलिनचा वापर चांगला होतो. 2. जेवणात अंतर ठेवा (Intermittent Fasting); रात्री 8 नंतर खाणं बंद करा. 3. साखर आणि मैदा टाळा; हळूहळू withdrawal करा. 4. दिवसाच्या सुरुवातीला 15-20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसा; insulin signaling सुधारतो. 5. पचन सुधारण्यासाठी लिंबू पाणी, सूप, ताक घ्या. 6. ताण कमी करा - प्राणायाम, मेडिटेशन, आणि चांगली झोप घ्या. 7. खऱ्या भुकेनं खा; emotional eating थांबवा. 8. निदान 7–8 तास नीट झोप घ्या.

इन्सुलिन सुधारण्यासाठी उपयुक्त अन्नपदार्थ: - मेथी दाणे (रात्री भिजवून) - दालचिनी (पाण्यात उकळून) - अंजीर, बदाम (2–3) - डाळींब, भोपळा, कारले - ताक, लिंबू पाणी, ओट्स, अंडी, सूप

वय 30–50 मधील व्यक्तींनी फास्टिंग इन्सुलिन लगेच तपासावे जर: - पोटावर चरबी आहे (belly fat) - सतत किंवा नेहमी थकवा जाणवतो - वजन वाढत आहे पण साखर नॉर्मल आहे - रात्री भूक लागते किंवा sweet cravings आहेत - PCOS, fatty liver, किंवा high triglycerides आहेत

लक्षात ठेवा, lifestyle सुधारण्याची वेळ अजूनही गेलेली नाही!

आजचं फास्टिंग इन्सुलिन तपासा — lifestyle मध्ये बदल करून 3 महिन्यांत सुधारणा होऊ शकते!

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#insulin-sensitivity#insulin-resistance#prediabetes#type-2-diabetes#pcos#fatty-liver#lifestyle#health-tips
Share:WhatsAppXFacebook