Diabetes
CGM म्हणजे test आहे की device?
CGM बद्दल पोस्ट टाकल्यानंतर खूप प्रश्न आले.
- CGM वर sugar अचानक २००+ का जाते? - Fasting sugar normal असूनही spikes असू शकतात? - Rice, stress की poor sleep, sugar जास्त कोण वाढवतं? - Time in Range म्हणजे नेमकं काय? - CGM report कशी समजायची?
म्हणून पुढील काही दिवस "Sugar Patterns" ही सिरीज साध्या भाषेत समजून घेऊ.
कारण metabolism समजून घेणं फक्त diabetic patients साठीच नाही तर: - pre-diabetes - obesity - fatty liver - insulin resistance - metabolic syndrome
असलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे.
1. CGM म्हणजे काय? CGM म्हणजे Continuous Glucose Monitoring. हा एक छोटा sensor असतो जो साधारण १४ दिवस शरीरातील glucose pattern सतत track करतो.
हा फक्त sugar report देत नाही, तर दाखवतो: - sugar कधी वाढते - किती वाढते - किती वेळ वाढलेली राहते - कधी कमी होते
2. मग हा test आहे की device? खरं तर दोन्ही. हा एक wearable device आहे.
पण त्यातून मिळणारा data continuous metabolic test सारखा असतो.
म्हणून CGM fasting sugar report पेक्षा जास्त माहिती देऊ शकतो.
3. CGM कुठे लावतात? साधारण हाताच्या मागच्या भागावर छोटा sensor लावला जातो. तो painless किंवा minimally painful असतो.
अनेकांना वाटतं सतत needle टोचलेली असते, पण तसं नाही.
4. मग finger prick ची गरज नाही का? काही CGM systems मध्ये routine finger pricks खूप कमी होतात, पण काही वेळा confirmation testing लागू शकते.
हे device आणि clinical situation वर अवलंबून असतं.
5. CGM फक्त diabetes साठी आहे का? नाही, आजकाल pre-diabetes, obesity, fatty liver आणि metabolic syndrome मध्येही CGM चा उपयोग वाढतोय.
कारण disease सुरू होण्याआधी patterns बदलायला लागतात.
6. कोणता CGM घ्यावा? अनेक brands उपलब्ध आहेत. माझ्या मते accuracy, affordability, app support, sensor duration, data sharing सुविधा महत्त्वाच्या आहेत.
Brand पेक्षा योग्य वापर आणि योग्य interpretation जास्त महत्त्वाचं आहे. कोणते device चांगले यावरही मी एक पोस्ट लिहीन.
7. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता? CGM data पाहणं सोपं आहे, पण तो समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
कारण प्रत्येक spike dangerous नसतो आणि प्रत्येक normal graph म्हणजे perfect metabolism नसतो.
Context महत्त्वाचा आहे: - जेवण - झोप - stress - activity - medicines - weight pattern
हे सगळं एकत्र पाहावं लागतं.
8. आज healthcare बदलत चाललंय.
पूर्वी patients symptoms सांगायचे, आता अनेक patients patterns दाखवतात.
आणि metabolic health समजून घेण्याची ही मोठी संधी आहे.
आज रात्री WhatsApp Channel वर एक interesting CGM graph share करणार आहे: - “Healthy” breakfast नंतर sugar 230+ का गेली? - एका रात्रीच्या poor sleep मुळे दुसऱ्या दिवशी spikes कसे वाढले? - Graph पाहून insulin resistance कसा संशय आला?
हे अगदी साध्या भाषेत explain करणार आहे.
ज्यांना body patterns आणि metabolism खोलात समजून घ्यायचं आहे त्यांनी WhatsApp Channel join करू शकतात.
हा पोस्ट pre-diabetes, diabetes, obesity किंवा fatty liver असलेल्या व्यक्तीला नक्की share करा.
कदाचित त्यांना अजून CGM म्हणजे नेमकं काय हे समजलेलं नसेल.
Like | Share | Follow
Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts
Follow Just for Hearts