Diabetes
वारंवार Blood Sugar तपासणं खरंच आवश्यक आहे का?
वारंवार Blood Sugar तपासणं खरंच आवश्यक आहे का?
होय, काही काळासाठी. जेव्हा Blood Sugar अनियंत्रित असतो, उपचार नवीन सुरू असतात, किंवा औषधांमध्ये बदल झालेला असतो, तेव्हा दिवसातून अनेक वेळा तपासणं गरजेचं असतं.
पण कायम नाही. Blood Sugar नियंत्रणात आल्यानंतर, वारंवार तपासणीची गरज कमी होते, पण नियमित ट्रेंड लक्षात घेणं आवश्यक असतं.
वारंवार Blood Sugar तपासण्याची गरज कमी करणारे 6 सोपे उपाय:
1. नेमका आहार पाळा Blood Sugar वाढणारे पदार्थ टाळल्यास fluctuations कमी होतात.
2. व्यायामात सातत्य ठेवा चालणं, योगा, स्ट्रेचिंग मुळे metabolism सुरळीत राहतं.
3. जेवणात Fiber आणि Protein वाढवा जेवणानंतर Blood Sugar हळू वाढते, त्यामुळे sudden spikes होत नाहीत.
4. रात्री उशिराचं जेवण टाळा बेडटाइम Blood Sugar स्थिर राहते, झोपेत hypo/hyperglycemia होत नाही.
5. दर 3 महिने HbA1c करून घ्या रोज तपासायचं नसले तरी 90 दिवसांची सरासरी कळते.
6. साप्ताहिक Blood Sugar लॉगिंग ठरवा आठवड्यातून 2-3 दिवस सकाळी आणि जेवणानंतर तपासल्यास ट्रेंड समजतो. Blood Sugar फक्त ‘किती आहे’ यापेक्षा ‘कधी किती होते’ हे जास्त महत्त्वाचं आहे.
Blood Sugar मोजणं हे औषध नाही, पण योग्य औषध देण्यासाठी डॉक्टरांचा नेमका दर्पण आहे. आहार आणि व्यायाम योग्य ठेवला, तर वारंवार Blood Sugar मोजायची वेळच येत नाही!