Nutrition
फणस – स्वादिष्ट आणि आरोग्यदायी!
फणस हा फक्त गोडसर उन्हाळी फळ नाही तर आरोग्याचा पॉवरहाऊस आहे! महागड्या imported fruits पेक्षा आपल्या स्थानिक फणसात Vitamins, Minerals आणि Fibre भरपूर प्रमाणात असतात.
महत्त्वाचे फायदे: 1. पचन सुधारते: Fibre मुळे बद्धकोष्ठता कमी होते. 2. इम्युनिटी मजबूत होते: Vitamin C संसर्ग टाळतो. 3. Blood Pressure नियंत्रण: Potassium रक्तदाब संतुलित ठेवतो. 4. हाडं मजबूत होतात: Magnesium आणि Calcium हाडांची ताकद वाढवतात. 5. ऊर्जा मिळते: Natural sugar आणि complex carbs दिवसभर ताकद देतात. 6. वजन नियंत्रण: पोटभर वाटल्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं. 7. डोळ्यांचे आरोग्य सुधारते: Vitamin A दृष्टी चांगली ठेवतो. 8. त्वचा आणि केस निरोगी राहतात: Antioxidants त्वचा आणि केस निरोगी ठेवतात. 9. पचनसंस्था चांगली राहते: चांगल्या बॅक्टेरियांसाठी पोषक. 10. Vegan Meat पर्याय: कच्चा फणस उच्च फायबर आणि कमी फॅट असलेला.
कसा खाल्ला तर चांगला? - कच्चा फणस: भाजी, कटलेट, सूप मध्ये वापरा. - पिकलेला फणस: थेट खा किंवा स्मूदी करा. - फणस बी: उकडून किंवा भाजून खा.
रुग्णांसाठी: - Diabetes असलेल्या लोकांसाठी: पिकलेला फणस मर्यादित प्रमाणात घ्या, कच्चा फणस अधिक योग्य. - Heart patients: उकडलेले बी आणि कमी तेलात भाजी करा. - Weight watchers: कच्च्या फणसाची भाजी, ज्यात भरपूर Fibre आणि कमी कॅलरी असते.
फणस हा नैसर्गिक ऊर्जा वाढवणारा आहे ज्यात Fibre, Vitamins आणि Minerals भरपूर असतात. तो पचन, इम्युनिटी, Blood Pressure आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे तसेच वजन नियंत्रणात मदत करतो. आपल्या आहारात हा स्थानिक, हंगामी आणि शक्तिशाली superfood नक्कीच समाविष्ट करा!
"फणस खा आणि तुमचा अनुभव share करा. तुमच्या एका share मुळे कुणाचं health बदलू शकतं!"
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts