Just For Hearts

Lifestyle

खऱ्या कथा, टिकणारे बदल: Just For Hearts ची Philosophy

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

अशा प्रतिक्रिया वाचल्या की एक गोष्ट ठामपणे कळते…

सुजाता ताईंनी लिहिलेला अनुभव हा एकट्यांचा नाही. अशाच कथा दररोज अनेक जण सांगतात.

Blood Sugar नियंत्रणात येणं, वेळेवर जेवण, जेवणानंतर थोडं चालणं, Yoga सारख्या साध्या सवयी – हे काही योगायोग नसतात. हे शरीर कसं काम करतं, त्याला काय मानवतं यावर आधारित खरे, टिकणारे बदल असतात.

म्हणूनच इथे जे वाचता, त्या फक्त “posts” नसतात…

सगळ्या posts मिळून एक शास्त्रीयदृष्ट्या रचलेली Lifestyle सुधारण्याची पद्धत आहे, जिला आपण ओळखतो Just For Hearts म्हणून.

उद्देश एकच: क्षणिक उपाय नकोत, मूळ कारणांवर काम करून Health हळूहळू पण टिकून सुधारावं.

महत्त्वाची गोष्ट स्पष्ट सांगतो: हे ज्ञान, हे मार्गदर्शन, 90% पेक्षा जास्त पूर्णपणे मोफत आहे आणि कायम राहील.

कारण योग्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, महागड्या साधनांशिवाय, Medicines, apps, devices, gym, supplements, gadgets शिवायही Health सुधारू शकतं हे लोकांना उमगावं.

शिकण्याचे वेगवेगळे मार्ग ठेवले आहेत: कुणाला short posts आवडतात, कुणाला polls, quizzes, कुणाला case stories, कुणाला live sessions.

म्हणूनच Just For Hearts YouTube, Facebook, Instagram, LinkedIn, X सगळीकडे सातत्याने सुरू आहे. जिथे सोयीचं वाटेल तिथे follow करा. सगळं free, सगळ्यांसाठी.

पण प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगावी लागते…

काही लोक म्हणतात, “वाचलं, समजलं… पण रोज पाळणं जमत नाही.”

त्यांच्यासाठी वेगळा मार्ग आहे: Challenge Membership. छोटे actionable steps, routine-based challenges, कोणताही अतिरेक नाही.

शेकडो जण हे follow करत आहेत कारण कोणी तरी सोबत आहे ही भावना बदल टिकवते.

आजार असलेल्यांसाठी अजून एक सुविधा आहे: Heart disease, Diabetes, Heart failure, Metabolic health, Obesity यांसाठी remote monitoring सहित Chronic care programs आहेत.

यात उद्देश एकचं: योग्य Medicine, योग्य Lifestyle, आणि शक्य असेल तेव्हा Medicines वर अवलंबन कमी करणं (तुमच्या नियमित Doctors शी समन्वय ठेवून).

WhatsApp वर ह्याविषयी अधिक शांतपणे माहिती घेता येईल, कोणतीही घाई नाही.

एक मुद्दा मुद्दाम अधोरेखित करतो:

इथे कधीही ऐकायला मिळणार नाही: ❌ Strict diet ❌ Heavy exercise ❌ Gym pressure ❌ महागडी उपकरणे, apps, tests

कारण आजचे Lifestyle diseases simple, शिस्तबद्ध आणि समजूतदार बदलांनीच खऱ्या अर्थाने टाळता येतात.

हे सगळं फक्त “Patients” साठी असेही नाही. आज आजारी असलेल्यांसाठी आहेच, पण त्याहून जास्त आज ठीक आहात, पण उद्या आजार नकोय अशा प्रत्येकासाठी आहे.

Health ही एक यात्रा आहे, आणि ती एकट्याने चालावी लागतेच असं नाही.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#lifestyle-medicine#preventive-health#diabetes-care#heart-health#simple-health#science-based-living#chronic-care#health-journey
Share:WhatsAppXFacebook