Just For Hearts

Diabetes

LADA: मध्यमवयीनांमधील Latent Autoimmune Diabetes

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

LADA म्हणजे Latent Autoimmune Diabetes in Adults, जो Type 2 सारखा दिसतो पण हळूहळू वाढणारा Type 1 diabetes आहे.

जर मध्यमवयीन व्यक्तीला अचानक Diabetes झाला, वजन कमी होत असेल, आणि गोळ्या घेत असतानाही HbA1c कमी होत नसेल, तर तो LADA असू शकतो.

LADA कधी आणि कसा संशय घ्यायचा? 1. वजन कमी होत आहे पण Blood Sugar कमी होत नाही. 2. गोळ्यांनी फायदा होत नाही, lifestyle changes करूनही HbA1c कमी होत नाही. 3. इतर autoimmune रोगांचा इतिहास जसे thyroid, vitiligo, RA. 4. Diagnosis नंतर काही महिन्यांतच insulin ची गरज भासते. 5. डॉक्टरांनी Type 2 समजून treatment दिली तरी control चांगला होत नाही.

पक्की खात्री कशी करायची? टेस्ट्स: 1. GAD antibody test: Positive असल्यास autoimmune Type 1 diabetes शक्यता. 2. C-peptide test: शरीर insulin तयार करत आहे की नाही हे समजते. 3. Fasting आणि postprandial sugars आणि HbA1c हे basic trend पाहण्यासाठी. 4. काही केसेसमध्ये IA2 आणि ZnT8 antibodies पण तपासले जातात.

मूळ उपाय lifestyle नाही तर coaching आणि insulin!

- योग्य वेळी insulin सुरू केल्याने complications टाळता येतात. - delay केल्यास retina, kidney, nerves यांवर परिणाम होतो. - diet, mental health आणि emotional acceptance साठी diabetes coaching अत्यावश्यक आहे.

LADA म्हणजे हळूहळू वाढणारा Type 1 diabetes, ज्यात गोळ्यांवर control येत नाही आणि insulin लागतो.

लवकर ओळख → योग्य treatment → शांत जीवन!

जर तुम्ही साखरेवर नियंत्रण ठेवण्यात अडचणीत असाल तर डॉक्टरांना विचारा: Could this be LADA?

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#lada#type1diabetes#gadantibody#cpeptide#hidden-diabetes#insulin-awareness#diabetes-coaching
Share:WhatsAppXFacebook