Lifestyle
Leptospirosis: शहरी Flood Fever जी तुम्हाला माहित असली पाहिजे
Leptospirosis: शहरी Flood Fever जी तुम्हाला आणि तुमच्या मुलांनाही होऊ शकते, विशेषतः पावसात पाय भिजल्यावर.
Leptospirosis म्हणजे काय? उंदीराच्या लघवीतून येणारा जीवाणू Leptospira साचलेल्या पाण्यात टिकतो. तो त्वचेतून, विशेषतः खरचटलेली किंवा फाटलेली त्वचा किंवा पायांच्या बोटांमधून शरीरात प्रवेश करतो.
शहरी भागात का जास्त आढळतो? - शहरातील निकृष्ट ड्रेनेज सिस्टिम - रस्त्यांवर पाणी साचणे - झोपडपट्टी, बांधकामाची ठिकाणं, चप्पल-शूज न घालणे - उंदीरसंख्या आणि मानवी संपर्क अधिक
गावाकडे पाणी वाहून जात असते, पण शहरात पाणी साचते आणि तिथे Leptospira वाढतो.
सुरुवातीची लक्षणे: 1. ताप आणि थकवा 2. डोकेदुखी आणि अंगदुखी 3. डोळे लालसर (conjunctival suffusion) 4. उलट्या आणि पोटदुखी
3-5 दिवसांत धोका वाढू शकतो: 5. डोळे पिवळे होणे (jaundice) 6. मूत्र कमी होणे किंवा थांबणे 7. श्वास लागणे 8. भ्रम किंवा रक्तस्त्राव
ही स्थिती Weil’s Disease म्हणून ओळखली जाते आणि ICU मध्ये admit व्हावे लागते.
निदान आणि उपचार: - चाचण्या: PCR, IgM ELISA, MAT - उपचार: Doxycycline किंवा Penicillin G - लवकर उपचार केल्यास 7-10 दिवसांत पूर्ण बरा होतो.
कधी हॉस्पिटलमध्ये admit व्हावे? - मूत्र बंद होणे - मानसिक गोंधळ - कमी ऑक्सिजन - प्लेटलेट्स कमी होणे किंवा रक्तस्राव
प्रतिबंध: पाण्यापासून नव्हे, तर पायातून टाळा: - गम बूट किंवा चप्पल वापरा - भिजलेली कपडे लगेच बदला - श्वासाची तक्रार, ताप, डोळे पिवळे झाले तर त्वरित डॉक्टरांकडे जा!
"पावसात साचलेलं पाणी फक्त भिजवायला नाही, जीवही घेऊ शकतं."
हे वाचल्याने तुम्हाला वेळेत सावध होण्याची संधी मिळाली आहे.
कृपया WhatsApp किंवा कॉलनी ग्रुपवर हे पुढे पाठवा, ज्यांना माहिती नाही त्यांना मदत करा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts