Just For Hearts

Heart Health

Angioplasty-बायपास नंतर खरं आयुष्य सुरू होतं

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Angioplasty-बायपास नंतर खरं आयुष्य सुरू होतं.

आजच्या Cardiac Rehab सेशनमध्ये केवळ रुग्णच नाही, तर त्यांच्या परिवारांनीही आशेचा नवा किरण अनुभवला. उपचारानंतर “काय करावं?”, “काय खावं?”, “पुन्हा heart problem होईल का?” या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक रुग्ण म्हणाले, “सर, ही सेशन म्हणजे नवीन जीवनाची दिशा मिळाल्यासारखं वाटलं!”

मी कसं मदत करतो ते सांगण्याऐवजी, त्यांच्याकडून ऐकूया:

एक सहभागी म्हणाले,

“नमस्कार, आज आपण जे सेमिनार आयोजित केले होते, ते खूपच सुंदर अप्रतिम झाले. आपल्या संपूर्ण टीमची एकजुट, आत्मीयतेने साधलेला संवाद, खेळ, गाणी मनाला भाऊन गेले. सम्पूर्ण आलेले पेशंट आणि त्यांचे सोबत आलेले नातेवाईक एकत्रित आल्याने विचारांची देवाणघेवाण झाली. आपण एका सेमिनार ला आलो नसून फॅमिली प्रोग्राम ला आल्याची फिलिंग जाणवली आणि या सम्पूर्ण वेळेत दुखणे आणि आजार दूर पळून गेला. परत आपल्या सम्पूर्ण टीमचे मनापासून कौतुक आणि आभार. ईश्वर आपल्या सम्पूर्ण टीम ला अशीच प्रेरणा देत राहो हीच प्रभु चरणी प्रार्थना. असे आपले सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत गेले तर कोणी आजारीच पडणार नाही आणि जो आजारी आहे तो त्वरित बरा होईल यात शंका नाही.

धन्यवाद: मुकुंद मुळे”

त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या डोळ्यातलं समाधान हेच आमचं यश आहे.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#cardiac-rehab#angioplasty#bypass#heart-care#heart-health#emotional-healing
Share:WhatsAppXFacebook