Just For Hearts

Heart Health

सर, echo मध्ये LVEF 28% आहे

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"सर, echo मध्ये LVEF 28% आहे, आता माझं आयुष्य कसं असेल?” हा प्रश्न मी रोज ऐकतो आणि तो खूप स्वाभाविक आहे.

पण उत्तर एकच आहे घाबरण्याचं कारण नाही.

LVEF हा एक नंबर आहे, भविष्य नाही.

EF 25–30% असलेले रुग्ण आज नीट आणि stable आयुष्य जगतात.

1. LVEF म्हणजे काय ते आधी स्पष्ट करूया.

Heart प्रत्येक ठोक्यात किती रक्त पुढे Pump करतो, त्याचा टक्का म्हणजे LVEF.

Normal LVEF साधारण 55–65%. 40% खाली आला की Low LVEF, Heart ची ताकद कमी झाली आहे असं समजतो.

2. कमी LVEF म्हणजे Heart बंद पडतो का?

नाही. Heart चालू असतो, पण जास्त मेहनत करूनही कमी काम करतो.

3. LVEF हा कायमचा शिक्का नाही. तो आजची स्थिती दाखवतो. योग्य उपचारांनी तो stable होऊ शकतो, कधी कधी वाढूही शकतो.

4. प्रत्यक्षात मी नियमितपणे बघतो की 25–30% EF असलेले अनेक रुग्ण:

- रोज चालतात - काम करतात - repeated admission टाळतात - घरच्यांसोबत quality life जगतात

5. Low LVEF रुग्णांना रोज काय जाणवतं?

- चालताना लवकर दम - थकवा पटकन येणं - जिने चढताना अडचण - कधी पाय सूज / रात्री श्वासाचा त्रास

6. योग्य उपचार सुरू केल्यावर काय बदल दिसतो?

- दम येणं हळूहळू कमी होतं - चालण्याची क्षमता वाढते - थकवा कमी होतो - रुग्णाचा आत्मविश्वास परत येतो

7. योग्य उपचारांचा खरा फायदा काय?

- Heart वरचा अयोग्य ताण कमी करतात - Heart ला जास्त कार्यक्षमतेने काम करण्याची संधी देतात - Heart आणखी कमजोर होण्याची प्रक्रिया थांबवतात किंवा खूप मंदावतात

ही सगळी सुधारणा योग्य औषधांच्या नियोजनामुळे Heart ला “स्वतःला सावरायला, स्थिर व्हायला आणि नीट काम करायला वेळ मिळतो.”

आज Heart failure म्हणजे शेवट नाही. योग्य औषधं, योग्य निवड आणि योग्य follow-up मुळे हा आज manage करता येणारा आजार झाला आहे.

स्वतःला आणि घरातल्या Heart patients ला एक प्रश्न: आपल्या echo मध्ये LVEF किती आहे? हा नंबर माहित असणं म्हणजे योग्य निर्णयांची सुरुवात.

चर्चा सुरू ठेऊया.

ही Heart Failure Rehab series आहे, आणखी अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढच्या दिवसांत आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत.

तुमचा प्रश्न, शंका, अनुभव comment मध्ये लिहा. तुमच्या प्रश्नांवरच पुढच्या पोस्ट्स ठरणार आहेत.

Dr. Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Sr. Consultant Physician & Cardiologist Specialist in Cardio Metabolic Diseases Just For Hearts

#low-lvef#heart-failure#cardiac-rehab#heart-recovery#heart-health#ef-percentage#heart-function#cardiology
Share:WhatsAppXFacebook