Lifestyle
22 मार्च 2020… आणि आज
"22 मार्च 2020… आणि आज"
आज गॅलरी scroll करताना हा जुना creative दिसला… आणि एकच विचार आला: 6 वर्षं झाली? कधी गेली ही?
त्या वेळी lockdown नवीन होता… सध्या "energy lockdown" अशा चर्चा ऐकतोय.
एक reel झाला की दुसरा reel… एक election संपलं की दुसरं सुरू… एक year end झाला की पुढचं planning.
कधी breakup stories, कधी scandals… कधी trending topics, कधी viral debates…
आजकाल सर्वसाधारणपणे आयुष्य असेच चालू आहे. हळूहळू जाणवतं आपण सगळं बघत राहतो, react करत राहतो… आणि नकळत आपणच "consumer" होतो.
हा फोटो पाहताना एक गोष्ट जाणवली, वेळ निघून जातो तेव्हा आवाज करत नाही.
आपण व्यस्त असतो… पण वेळ शांतपणे पुढे गेलेला असतो.
त्या काळात video consultations सुरू केले, YouTube वर बोलायला सुरुवात केली… Remote monitoring सुरू केले.
आज तेच दैनंदिन कामाचा एक नैसर्गिक भाग झालं आहे.
कधी कधी थांबून वाटतं 6 वर्षं… एका scroll सारखी निघून गेली.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts