General Health
आज आरोग्यात सगळ्यात मोठा धोका “Disease” नाही…
आज आरोग्यात सगळ्यात मोठा धोका “Disease” नाही… तर तो “चुकीची माहिती” आहे.
आज influencers, podcasts, articles, ads सगळेच “झटपट उपाय” सांगत आहेत. पण clinic मध्ये मी रोज जे पाहतो ते वेगळंच असतं.
Think Again या पुस्तकातील विचार तसेच पाहीलेले लाखो patient यांच्याकडून, मला आरोग्याबाबत काही महत्वाचे धडे मिळाले, जे प्रत्येक patient आणि caregiver ने शिकणं गरजेचं आहे 👇
1. Health advice = universal नसतं जे एका माणसाला चालतं ते दुसऱ्याला अपायकारक ठरू शकतं. “सगळ्यांसाठी एकच उपाय” हा मोठा trap आहे.
2. Confident बोलणं ≠ बरोबर बोलणं ठामपणे सांगितलं म्हणून ते सत्य असतंच असं नाही. Health मध्ये confidence पेक्षा context महत्वाचा.
3. “मी हे वर्षानुवर्षे करतो” ही हमी नाही जुनी सवय नव्या science समोर टिकेलच असं नाही. Think Again म्हणजे unlearning.
4. Paid content फार आकर्षक असतं Newspaper articles, TV segments, reels अनेकदा sponsored असतात. माहिती दिसते, पण उद्देश विक्री असतो.
5. Influencer ≠ Medical expert Followers असणं म्हणजे experience असणं नाही. Health advice देणारा active clinical practice मध्ये आहे का? हा प्रश्न विचारा.
6. Anecdote ≠ evidence “माझ्या ओळखीच्या माणसाला फायदा झाला” हा scientific proof नाही. Evidence journals मधून येतं, comments मधून नाही.
7. Overpromise = warning sign “10 दिवसात Weight”, “Medicine बंद” अशा वाक्यांपासून सावध राहा. Health मध्ये shortcut नसतो.
8. Smart patient कोण? जो विचारतो * हे माझ्यासाठी योग्य आहे का? * यामागे data आहे का? * हे paid तर नाही ना?
9. Clinic reality (मी रोज पाहतो) Misinformation मुळे * treatment delay * unnecessary fear * चुकीचे निर्णय हे सगळं वाढतं.
10. आरोग्यासाठी Think Again म्हणजे ऐका. वाचा. पण लगेच follow करू नका. विचार करा. प्रश्न विचारा. मग निर्णय घ्या.
माझे मत आरोग्य म्हणजे trends follow करणं नाही, ते समजून निर्णय घेणं आहे.
काहीही विकत घेण्याआधी, काहीही सुरू करण्याआधी एक प्रश्न स्वतःला विचारा…
“मी खरंच योग्य ठिकाणाहून ऐकतोय का?”
कधी कधी सगळ्यात शहाणा निर्णय असतो Think Again.
Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts